ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दिंडीत घुसून ७ वारकऱ्यांना कारने चिरडले, कार्तिकी सोहळ्यावर दुःखाचे सावट

सांगोला : मिरज येथून कार्तिक वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये घुसून कारने ७ भाविकांना चिरडले. हा भीषण अपघात सांगोला तालुक्यातील जुनोनी येथे काल सायंकाळी सातच्या सुमारास घडली. या दुर्घटनेमध्ये ८ वारकरी गंभीर जखमी झाले आहेत.

हे सर्व वारकरी कोल्हापूर तालुक्यातील जठारवाडी गावचे रहिवाशी आहेत. वारकऱ्यांचे दिंडी कार्तिकी वारीसाठी पायी निघाली होती. जुनोनीजवळ सायंकाळी सातच्या सुमारास एक कार थेट दिंडीत घुसली व त्या कारने वारकऱ्यांना उडविले. या कारची धडक इतकी जोरात होती की, सात वारकरी जागेवरच ठार झाले तर अन्य आठ वारकरी जखमी झाले आहेत. त्यापैकी दोन जण गंभीर जखमी असून त्यांना सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांना सांगोला-मिरज मार्गावर वाहनाने चिरडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये तातडीच्या मदतीचीदेखील त्यांनी घोषणा केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी हे वृत्त कळताच तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला तसेच या घटनेतील जखमी वारकऱ्यांना ताबडतोब योग्य ते उपचार देण्यात यावे असे निर्देश दिले. हा अपघात कसा झाला याविषयी तातडीने चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

मृत वारकऱ्यांचे नावे 

शारदा आनंद घोडके, सुशीला पवार, गौरव पवार, रामराव श्रीपती जाधव, सुनीता सुभाष काटे, शांताबाई सुभाष जाधव, आणि रंजना बळवंत जाधव अशी मृतांची नावे आहेत.

जखमी वारकऱ्यांचे नाव खालील प्रमाणे

अनिता गोपीनाथ जगदाळे, अनिता सरदार जाधव, सरिता अरुण सियेकर, शानुताई विलास सियेकर, सुभाष केशव काटे, कार चालक तुकाराम दामू काशीद, दिग्विजय मानसिंग सरदा

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!