ध्यास विश्वसार्ह बातमीचा

इंटरनॅशनल लायन्सकडून अक्कलकोट तालुक्याला ८ लाखांचा निधी मंजूर; नुकसानग्रस्तांना होणार मदत

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट, दि.३१ : गेली दोन महिने अक्कलकोट तालुक्यात अनेक ठिकाणी ढगफुटी होऊन प्रचंड पाऊस झाला. त्यामुळे अनेक गावातील वाडीवस्तीवरील राहत्या ठिकाणी खूप नुकसान झाले. यामध्ये गरीब लोकांचे खूप नुकसान झाले. याचीदखल इंटरनॅशनल लायन्सने घेतली असून आठ लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे. लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजशेखर कापसे यांनी ही माहिती माध्यमांना दिली आहे. लायन्स इंटरनॅशनल संघटनेकडे त्यांनी तातडीची मदत मागितली होती. त्याची दखल घेऊन इंटरनॅशनलने १० हजार डॉलर म्हणजे आठ लाख रुपये मंजूर केले आहेत. ही मदत गरीब गरजू लोकांना वस्तूरुपात देण्यात येणार आहे.

आंतरराष्ट्रीय लायन्स संघटना ही गेली १०५ वर्षे जगभरात २१० देशात सेवाभावी वृत्तीने कार्यरत आहे. जगभरात ज्या ज्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती झाली, त्याठिकाणी मदत दिली आहे. डोळ्याचे आजार, मधुमेह कमी करणे, बालकातील कॅन्सर कमी करणे, भुकेलेल्याना अन्नदान करणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे या सर्व मुख्य गोष्टीवर संघटना विनामोबदला काम करत आहे.कापसे हे सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुुदुर्ग, पुणे जिल्ह्यातील इंदापूर व बारामती या सहा जिल्ह्याचे प्रमुख आहेत. ते गेली अनेक वर्षे झाली लायन्स क्लबच्या माध्यमातून सेवाभावी वृत्तीने कार्यरत आहेत. अनेक सेवा उपक्रम राबविले आहेत. त्यांनी आजपर्यंत आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थांना मदत दिली आहे.

प्रांतामध्ये ५० पेक्षा जास्त चिल्ड्रन्स पार्क उभे करण्यासाठी मदत केली आहे. प्रांतातील अनेक क्लबना त्यांनी मदत केली आहे. अक्कलकोट लायन्स प्राथमिक शाळेस त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने आंतरराष्ट्रीय संघटनेकडून ४० लाख रुपये मंजूर करून आणले आहेत. लायन्स क्लब अक्कलकोटचे अध्यक्ष मल्लिकार्जून मसूती, ट्रस्ट अध्यक्ष राजेंद्र हत्ते, माजी अध्यक्ष महेश हिंडोळे, राजशेखर हिप्परर्गी यांनी राजशेखर कापसे यांचे अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!