नवी दिल्ली : जगभरातील खुल्या बाजारपेठेच्या तुलनेत कोविड -१९ लसींचे किंमत भारतात अधिक असल्याचे दिसून आले आहे. या कोरोना लसींच्या किंमतीवरून राज्यांकडून होणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने सिरम आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांशी चर्चा सुरु केली आहे. केंद्र सरकारने या दोन्ही कंपन्यांना लसीचा दर कमी करण्यासंदर्भात विचारणा केली आहे.
त्यानुसार भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस राज्य सरकारला ६०० रुपये आणि खासगी रुग्णालयांना १२०० रुपयांत विकली जाणार आहे. तर सिरमच्या कोविशील्ड लसीसाठी हा दर अनुक्रमे ४०० आणि ६०० रुपये इतका आहे.पण दोन्ही लसीतील किमतीचा फरक कशामुळे याचे स्पष्टीकरण झालेली नाही.काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी किमतीतील फरकाबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते.सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकने लसींच्या वाढीव किंमतीचे समर्थन केले आहे.लसीच्या भारतातील किंमत व इतर देशातील लसीच्या किंमती याची तुलना करणे अन्यायीपणाचे होईल असे मत सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावला यांनी व्यक्त केले होते.
भारत बायोटेकने किंमतीचे स्पष्टपणे समर्थन केले नसले तरी खर्च भरून निघण्यासाठी एवढी किमत ठेवल्याचे म्हंटले आहे.
मात्र, या दोन्ही कंपन्यांनी केंद्र सरकारला याच लसी अवघ्या १५० रुपयांना विकल्या होत्या. त्यामुळे अनेक राज्यांनी सिरम आणि बायोटेकच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. संकटाच्या काळात या दोन्ही कंपन्या नफेखोरी करत असल्याचा आरोपही राज्यांनी केला होता. त्यामुळे आता केंद्र सरकारने हा वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेऊन दोन्ही कंपन्यांशी चर्चा सुरु केली आहे. तेव्हा आता सिरम आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्या लसींची किंमत कमी करणार का, याकडे सर्वांच्या लक्ष लागल्या आहेत.