पुणे : काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे पुण्यातील जहाँगिर हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. राजीव सातव यांना २२ एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. काल त्यांची प्रकृती पुन्हा एकदा गंभीर झाल्याने शनिवारी पहाटे पासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.राजीव सातव यांच्या निधनाची माहिती काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदिप सुरजेवला यांनी दिली आहे. राजीव सातव हे काँग्रेस वर्कींग कमिटीचे सदस्य होते.राजीव सातव काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचे अंत्यत निकटवर्तीय व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. राजीव सातव यांच्या निधनाची बातमी राज्यात धडकल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी सातव यांना आदरांजली वाहिली आहे.काँग्रेस पक्षाने तरुण, तडफदार, अभ्यासू सदस्य गमावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.राजीव सातव यांच्या अकाली निधन हे केवळ काँग्रेस पक्षाची नुकसान नाहीतर संपूर्ण महाराष्ट्राचा नुकसान आहे अशी भावना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.
पुण्यात जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने २४ तास त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. खासदार राजीव सातव पुणे येथे जहाँगिर हॉस्पिटल येथे उपचार घेत होते. 29 एप्रिल रोजी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते.
राजीव सातव यांना ४ वेळा संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मागील आठवड्यात त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. राजीव सातव मुक्त झाल्यानंतर त्यांच्या शरीरात सायटोमॅगीलो हा नवा व्हायरस सापडला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल जालना येथे दिली होती. ते व्हेंटिलेटर शिवाय श्वास घेत होते. मात्र त्यांच्या शरीरात सायटोमॅगीलो हा नवा वायरस सापडला असून त्यांच्यावर योग्य उपचार करण्यासाठी सूचना देण्यात आले आहेत. आपण त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेणार असल्याचेही टोपे यांनी सांगितले होते.