अक्कलकोटच्या ट्रामा केअर सेंटर बाबत दोन दिवसात निर्णय घ्या ; पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची जिल्हाधिकार्यांना सूचना
अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोटच्या
ट्रामा केअर सेंटरचे काम गेल्या चार वर्षापासून रखडले असून हे काम तातडीने मार्गी लावण्यासंदर्भात येत्या दोन दिवसात बैठक घ्या आणि हा प्रश्न मार्गी लावा,असे आदेश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी
दिले आहेत. शनिवारी, दुपारी अक्कलकोट नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अशपाक बळोरगी यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर त्यांनी पालकमंत्री भरणे यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यानंतर भरणे
यांनी यांना हे आश्वासन दिले.
यासंदर्भात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनाही पालकमंत्र्यांनी यासंदर्भात विचारणा
केली असून येत्या दोन दिवसात संबंधित विभागाची बैठक लावा आणि काम का थांबले याची चौकशी करा आणि हे काम तातडीने पूर्ण करण्यासंदर्भात निर्णय घ्या,
हा प्रश्न त्वरित मार्गी लागला पाहिजे,हा विषय गंभीर आहे, अशा प्रकारची सूचना भरणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. वास्तविक पाहता २०१५ साली हे काम मंजूर झाले आहे सदरचे काम चार कोटी पेक्षा अधिक रकमेचे आहे असे असताना ठेकेदाराला संबंधित विभागाने दोन वेळा नोटीसपण दिली आहे तरीही हे काम संथ गतीने ते करत आहेत.
ट्रामा केअर अभावी अनेक लोकांचा आज जीव जात आहे याला जबाबदार संबंधित विभाग आहे ही बाब समोर यावी आणि हा विषय मार्गी यावा म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे.
तसेच पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या समोर पण ही बाब खुली केली आहे,असे बळोरगी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले