---Advertisement---

अखेर ऑलम्पिक पदक विजेता सुशीलकुमारला अटक

Follow Us:
---Advertisement---

दिल्ली : ऑलिंपिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला पंजाबमधून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर दुसऱ्या एका कुस्तीपटूची हत्या केल्याचा आरोप आहे. मागील १८ दिवसांपासून फरार असलेला सुशील कुमार पंजाबमध्ये लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापेमारी करत दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकाने त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी सुशील कुमारवर एक लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. सुशील कुमारची माहिती देणाऱ्याला १ लाखांचे रोख बक्षिस दिल्ली पोलिसांकडून देण्यात येईल. तर अजय कुमार यांची माहिती देणाऱ्याला ५० हजारांचे बक्षिस देण्यात येणार आहे.’ असे दिल्ली पोलीस डीसीपी उषा रंगनाणी यांनी सांगितले होते.

यानंतर सुशील कुमारने या विरोधात दिल्ली न्यायालयात जामीनसाठी याचिका दाखल केली होती. परंतु, दिल्ली न्यायालयाने सुशील कुमारची याचिका फेटाळली होती.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!