सोलापूर, प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यात टंचाई निवारणार्थ दि. 26 नोव्हेंबर 2026 रोजी 212 गावे व 1190 वाड्यांमधील 4 लाख 96 हजार 599 नागरिकांना व 1 लाख 73 हजार 943 पशुधनाला 260 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय 52 विहिरी व 42 बोअर असे एकूण 94 जलस्रोत अधिग्रहित करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही.डी. राठोड यांनी दिली.
तालुकानिहाय मंगळवेढा 46 गावे – 68 टँकर, सांगोला 41 गावे – 65 टँकर, अक्कलकोट 29 गावे – 19 टँकर, माढा 19 गावे – 24 टँकर, बार्शी 18 गावे – 8 टँकर, करमाळा 18 गावे – 16 टँकर, माळशिरस 11 गावे – 11 टँकर, उत्तर सोलापूर 9 गावे – 16 टँकर, दक्षिण सोलापूर 9 गावे – 14 टँकर, मोहोळ 11 गावे – 18 टँकर असून पंढरपूर 1 गाव व 1 टँकर.
जिल्ह्यात टंचाईग्रस्त भागात टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.











