---Advertisement---

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री झाल्या तर शपथविधीला जाणार; राऊतांचा टोला!

Follow Us:
---Advertisement---

मुंबई वृत्तसंस्था : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मिश्किल विधान केले आहे. सुप्रिया सुळे मुख्यमंत्री झाल्या तर त्यांच्या शपथविधी सोहळ्याला आपण नक्की उपस्थित राहू, असे राऊत म्हणाले. तसेच केवळ १० आमदार असलेल्या पक्षाला मुख्यमंत्रीपद देण्याइतकी दिलदारी भाजपकडे आहे, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.

गेल्या काही दिवसांपासून सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. शरद पवार गट एनडीएमध्ये सहभागी होण्याच्या बदल्यात मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार असल्याचीही चर्चा सुरू आहे. मात्र, सुप्रिया सुळे यांनी या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.

याबाबत माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, सुप्रिया सुळे यांची कालची प्रतिक्रिया मी पाहिली आहे. गेल्या १२ वर्षांपासून मी मंत्रिपदाची शपथ घेत आहे, असे त्या म्हणाल्या होत्या. सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्रीपद मिळत असेल तर महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळेल. केवळ १० आमदार असलेल्या पक्षाला भाजप मुख्यमंत्रीपद देऊ शकते, इतकी दिलदारी भाजपकडे आहे. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री व्हावे. त्यांच्या शपथविधीनंतर आम्ही बोलू, असे मिश्किल विधान राऊत यांनी केले.

दरम्यान, या संपूर्ण राजकीय घडामोडींवर उद्धव ठाकरे यांची भूमिका आणि निर्णय महत्त्वाचा असल्याचेही राऊत यांनी नमूद केले. सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर राऊत यांनी केलेल्या या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!