---Advertisement---

अक्कलकोटमध्ये सात शेत-पाणंद रस्त्यांना मंजुरी

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय असून मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ता योजनेअंतर्गत सात रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. या कामांसाठी एकूण एक कोटी २९ लाख ६६ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अशी माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली.

तालुक्यातील बोरामणी, मुस्ती, संगदरी, पितापूर, तडवळ आणि चपळगाव या सहा गावांमध्ये हे सात रस्ते तयार करण्यात येणार आहेत. या रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाणे सोपे होणार आहे. सध्या अनेक ठिकाणी पावसाळ्यात शेतरस्त्यांवरून ये-जा करताना अडचणी येतात. तसेच शेतातील माल बाजारपेठेत नेण्यासाठीही त्रास सहन करावा लागतो. हे रस्ते तयार झाल्यानंतर या अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे.

शेतकऱ्यांना वर्षभर वापरता येतील असे रस्ते उपलब्ध करून देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची सुविधा सुधारून शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. या कामांना निधी मंजूर केल्याबद्दल भाजपा-महायुती सरकारचे आभार मानतो,
असे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!