---Advertisement---

अक्कलकोटमध्ये पाणीटंचाई तीव्र! २९ गावांना टँकर

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : अक्कलकोट
तालुक्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाला टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी तालुक्यातील १८ गावांमध्ये १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, आता पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली असून सध्या २९ गावांना १९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

तालुक्याची पाणीपुरवठ्याची प्रमुख आशा असलेले कुरनूर धरणही मृतसाठ्यात गेले
आहे. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाईचे संकट आणखी गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धरणात पुरेसा पाणीसाठा नसल्याने ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरत आहे.

पावसाने ओढ दिल्याने आणि उपलब्ध जलसाठे कमी झाल्याने अनेक गावांमध्ये पाण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. सध्याची परिस्थिती पाहता आगामी काळात टँकरची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाला संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून आतापासूनच नियोजन करावे लागणार आहे. दुष्काळाची झळ वाढत असल्याने नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!