---Advertisement---

अॅड. असीम सरोदे यांच्या हस्ते ‘डॉ. आंबेडकर एक चिंतन’चे शुक्रवारी प्रकाशन

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर, (प्रतिनिधी) ज्येष्ठ समाजवादी विचारवंत मधु लिमये यांनी लिहीलेल्या ‘डॉ. आंबेडकर एक चिंतन’ या ऐतिहासिक ग्रंथाच्या प्रा. डॉ. एम. डी. शिंदे यांनी केलेल्या मराठीतील अनुवादीत आवृत्तीचे ‘निर्भय बनो’ कार आणि ज्येष्ठ घटनातज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांच्या हस्ते शुक्रवार दि. २७ नोव्हेंबर रोजी प्रकाशन करण्यात येणार आहे. येथील ‘सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठान’च्या पुढाकारातून निर्मलकुमार फडकुले सभागृहात सायंकाळी सहा वाजता आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे असणार असल्याची माहिती अनुवादक प्रा. डॉ. एम. डी. शिंदे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीदास सोनकवडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

ते पुढे म्हणाले की, सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठान हे १९९५ पासून सामाजिक सेवेत आहे. गरिब आणि हुशार मुलांसाठी राहण्याची व जेणाची मोफत सोय असलेले वसतिगृह, वैद्यकीय अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या मुलांना आर्थिक मदत, गरिब मुलांसाठी मोफत स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र, सुसज्ज ग्रंथांची स्पर्धा परिक्षा अभ्यासिका, कौशल्य विकास कार्यक्रम, व्याख्यानमाला असे विविध लोकोपयोगी उपक्रम प्रतिष्ठानच्या वतीने चालविले जातात. याशिवाय गेल्या दोन वर्षांपासून प्रतिष्ठानने पुढाकार घेऊन दुर्मिळ व समाजाला दिशा देणाऱ्या ग्रंथांचे प्रकाशनही करण्याचे कामही सुरू केले आहे. यात दोन हजार किलोमीटरचा प्रवास करून तथ्यांवर आधारीत लिहीलेले ‘वचनरक्षक डोहर ककय्या’, कुमार ककय्या पोळ यांच्या ‘सनातन धर्मदर्शन’ या चन्नवीर भद्रेश्वरमठ अनुवादीत ग्रंथाचे यापूर्वीच प्रकाशन झाले आहे. आता ज्येष्ठ समाजवादी विचारवंत मधु लिमये यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अतुलनीय योगदानावर प्रकाश टाकणाऱ्या ‘डॉ. आंबेडकर एक चिंतन’ या ऐतिहासिक ग्रंथाच्या अनुवादीत मराठी आवृत्तीसाठी प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे. या ग्रंथाचा वालचंद महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रोफेसर डॉ. एम. डी. शिंदे यांनी मराठीत अनुवाद केला असून या ग्रंथांच्या प्रकाशन सोहळ्याला अॅड. असीम सरोदे व सुशीलकुमार शिंदे यांच्यासह ज्येष्ठ आंबेडकर विचारवंत दत्ता गायकवाड, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत प्राचार्य नरेश बदनोरे, ज्येष्ठ उद्योजक दत्ताअण्णा सुरवसे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरी या सोहळ्याला सोलापुरातील रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही त्यांनी केले. या पत्रकार परिषदेला दत्ता गायकवाड, नागनाथ सोनकवडे, सचिदानंद व्हटकर, चन्नवीर भद्रेश्वरमठ, दत्ता थोरे आर्दीची उपस्थिती होती.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!