---Advertisement---

सोलापुरात ऊस दराची कोंडी फुटली! 3,250 + 100 + 100 चा फॉर्म्युला मान्य

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर वृत्तसंस्था : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ऊस दराच्या संघर्षाला अखेर यश आले आहे. माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने 3 हजार 250 रुपये + 100 + 100 रुपये असा ऊस दराचा फॉर्म्युला मान्य केला आहे. त्यामुळे ऊस दरावरून सुरू असलेला तिढा सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या आदेशानुसार, शेतकऱ्यांना पहिली उचल म्हणून प्रतिटन 3 हजार 250 रुपये देण्यात येणार आहेत. तर कारखान्याचे गाळप संपल्यानंतर अतिरिक्त 100 रुपये दिले जातील. तसेच वर्षभर साखरेचा दर प्रतिकिलो 45 रुपयांच्या पुढे राहिल्यास आणखी 100 रुपये देण्याचे कारखाना प्रशासनाने मान्य केले आहे.

दरम्यान, ऊस दराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली होती. पहिली उचल 3 हजार 500 रुपये मिळाल्याशिवाय कारखाना सुरू करू देणार नाही, असा पवित्रा संघटनेने घेतला होता. राजू शेट्टी यांच्या इशाऱ्यानंतर पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे कारखान्यावर गव्हाण बंद आंदोलनही सुरू करण्यात आले होते.

अखेर कारखाना प्रशासनाने 3,250 + 100 + 100 रुपयांचा फॉर्म्युला मान्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन स्थगित केले आहे. या दराबाबतचे अधिकृत पत्र आज जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील ऊस दराचा संघर्ष आता मिटण्याच्या मार्गावर असून शेतकऱ्यांचे लक्ष प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे लागले आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!