ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कल्लहिप्परगे शिवारात रानगव्याचा धुमाकूळ,ग्रामस्थ भयभीत

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील कल्लहिप्परगे येथे अचानक रानगव्याचे आगमन झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसनेचे तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी संबंधित वनविभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाला माहिती दिली.त्यानंतर त्वरित वनविभाग व पोलीस प्रशासन दखल घेत संपूर्ण परिसर सील केला.संबंधित यंत्रणा कल्लहिप्परगे गावात पोहचताच रानगव्याचा धुमाकुळ सुरु झाला. गव्याला पकडण्यासाठी गावकरी, वनविभाग व पोलीस प्रशासन शर्तीचे प्रयत्न करताना दिसून येत होते.तेव्हा या परिसरात एकच गोंधळ सुरु झाला.

परिसरात भितीचे वातावरण निर्माण होऊन नागरिक गावाकडे पळ काढताना दिसून येत होते.तेव्हा संबंधित वन विभाग व पोलीस परिसरातील गावांना अलर्ट करताना दिसून येत होते.परिसरात ऊसाची शेती असल्याने ऊसात गवा आश्रय घेतल्याचे सांगण्यात आले.सायंकाळी उशीरापर्यंत गव्याला पकडण्यासाठी वन विभाग व पोलीस प्रशासनाचा शर्तीचे प्रयत्न सुरु होते. पण तो सापडला नाही.

वनविभाग टीम मध्ये कुताटे,विभुते आदी सहकारी उपस्थित होते. तसेच दक्षिण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली मल्लिनाथ कलशेट्टी,संजय पांढरे,भाऊ सरवदे,लक्ष्मण कांबळे गोलू बिराजदार, पोलीस पाटील संतोष गुजा व शिवसेनेचे तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी गावपातळीवरील शिवसेना कार्यकर्त्यांना मदतीला घेऊन वनविभाग व पोलीस प्रशासनाला मदत
करत होते.

यामध्ये अनिल गुजा,भिमाशंकर भैरुणगी, माळप्पा पुजारी,अमोगी शिंगे,विद्याधर शिंगे,पंडित मोरे,यल्लप्पा मोरे,सिध्दु कोटी,लक्ष्मण हडपद,राकेश मणुरे,सुरेश आलुरे,श्रीपती मोरे,नितीन मोरे,शिवराय मोरे,रघु मोरे,संजय सुतार,शांतु पट्टणशेट्टी,मुनाफ चिरके व गावातील बहुसंख्य तरुण वर्ग आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!