लोकनेते स्व.सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त आयोजीत रक्तदान शिबिरात ९०१ जणांनी केले रक्तदान, ५०१ जणांनी घेतला कोविड-१९ लसिकरणाचा लाभ
गुरुशांत माशाळ
दुधनी दि. ०२ : लोकनेते स्व. सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त येथील म्हेत्रे मळा येथे भव्य रक्तदान शिबिर, कोविड-१९ लसिकरणा आयोजन करण्यात आले होते.याला भरभरून प्रतिसाद मिळाला.
सदर रक्तदान कार्यक्रमाचे उद्घाटन माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष शंकर म्हेत्रे, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितिचे सभापती प्रथमेश म्हेत्रे, नगरसेवक डॉ. उदयकुमार म्हेत्रे, दुधनी कॉंग्रेसचे (आय) शहर अध्यक्ष गुरुशांत ढंगे, दुधनी अडत व भुसार व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष परमशेट्टी, उपाध्यक्ष राजशेखर दोशी, शिवानंद माड्याळ, शंकर भांजी, बसवराज हौदे, गुरुशांतप्पा परमशेट्टी, शिवानंद हौदे, रामचंद्र गद्दी, गुरूशांत हबशी व इतर मान्यवर उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरात ९०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर ५०१ जणांनी कोविड-१९ लसीकरणाचा लाभ घेतला. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. तर रक्त संकलन सोलापूर ब्लड सेंटर, अश्विनी ब्लड बँक, अथहर ब्लड बँक, अक्षय ब्लड बँक, मेडिकेयर ब्लड सेंटर, मल्लिकार्जुन ब्लड सेंटर यांनी केले.
रक्तदान यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत म्हेत्रे,लक्षमीपुत्र हबशी, लक्ष्मीपुत्र कोटनूर, सुरेश म्हेत्रे, मलकण्णा गद्दी, अक्कलकोट तालुका युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष बाबा पाटील, श्री बसव प्रतिष्टानचे अध्यक्ष मल्लिनाथ येगदी, बसव भारत संघटनेचे अध्यक्ष गुरुशांत उप्पीन, सद्दाम शेरीकर, अभिजीत कांबळे, अभिषेक परमशेट्टी, जागृत महादेव मित्र मंडळाचे अध्यक्ष महेश स्वामी, दुधनी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष शशिकांत सावळसूर, दयानंद म्हेत्रे, संजय म्हेत्रे, सुनील आळंद, महेश चिंचोळी, राहुल बिराजदार, काशीनाथ यरगल, महांतेश पाटील, महेश कोटनुर, रतिष कोटनुर, उमेश आळंद, महेश कोटनुर, अबुसलेम नाकेदार, प्रशांत गद्दी, अनिल हंगरगी, गुरुशांत मगी, चंद्रकांत कामजे, लक्ष्मीपुत्र कनोजी, गुरुशांत मसुती, संतोष खराडे, श्रीशैल मातारी, भागेश इरशेट्टी, मातोश्री लक्ष्मीबाई सा. म्हेत्रे प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि गुरुशांतलिंगेश्वर ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापक कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.