ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात १५ जूनपर्यंत निर्बंध कायम व्यापाऱ्यांमध्ये नाराजी

सोलापूर : सोलापूर शहरातील कोरोनाचा संसर्ग कमी झाला, परंतु जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्ण संख्या कमी झाली नसून मृत्यू दरही चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवा वगळून अन्य कोणत्याही दुकानांना परवानगी न देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी काल घेतला.तोच निर्णय महापालिका आयुक्तांनी सोलापूर शहरासाठी लागू केला आहे. रुग्ण आणि मृत्यू दर पाहून 15 जून नंतर अनेक दुकानं बाबत निर्णय घेतला जाणार असल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.

★ १५ जूनपर्यंत लॉकडाउन संबंधित जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांची काय आदेश आहे ते जाणून घेऊया 

भाजीपाला, डेरी, बेकरीसह सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांचा दुकानांना सकाळी सात ते अकरा पर्यंत उघडण्यास परवानगी असेल.

■ रस्त्याकरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना पार्सल व घरपोच सेवेसाठी सकाळी सात ते रात्री आठपर्यंत मुभा असेल.

■ हॉटेल, रेस्टॉरंट, बार बंद राहतील. पण होम डिलिव्हरी व पार्सल सेवेसाठी परवानगी असेल.

■ सार्वजनिक वाहतूक, टॅक्सी, बस सेवा सुरू होईल. पण प्रवाशांची मर्यादा पूर्वीप्रमाणेच पाळावी लागणार आहे.

■ विवाहासाठी 25 व्यक्तींची मर्यादा असेल, विवाह समारंभातील लोकांकडे कोरोना चाचणीचा रिपोर्ट बंधनकारक असणार आहे.

■ परीक्षांना सवलत असेल, मात्र परीक्षेसंबंधीतील सर्वांना कोरोना चाचणीचे अट बंधनकारक असेल.

■ शेती क्षेत्राशी निगडित व सर्व दुकानांना सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत परवानगी असेल.

■ सोलापूर शहरात दुचाकीवर डबलसीट बसण्याला या आदेशानुसार परवानगी देण्यात आली आहे.

■ सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कटिंगचे दुकान मात्र बंदच राहतील.

■ सोलापूर जिल्ह्यातील मंदिर-धार्मिक स्थळे बंदच राहतील. मात्र नित्य पूजा चालू राहतील.

■ सिनेमगृहे, नाट्यगृहे, व मनोरंजनाची कोणत्याही सेवा सुरू राहणार नाही.

■ पेट्रोल पंप आणि बँकिंग सेवा पूर्ववत चालू राहतील.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!