अक्कलकोट, दि.६ : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी न्यास, महाराष्ट्र बहुजन शिवजन्मोत्सव युवक मंडळ व अमोलराजे भोसले मित्र परिवार यांच्यावतीने शिव छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.
दरम्यान शिवराज्याभिषेक दिना निमित्त अन्नछत्र मंडळात असलेल्या छत्रपतींच्या सिंहासनारुढ मूर्ती व मेघडंभरीस आकर्षक फुलांनी सजविण्यात आलेले होते.
छत्रपतींच्या मूर्तीचे पूजन युवक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुरेशचंद्र सुर्यवंशी, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, शिवसेना तालुका प्रमुख संजय देशमुख, शहर प्रमुख योगेश पवार, मराठा सेवा संघाचे ता.अध्यक्ष प्रविण घाटगे, शहर अध्यक्ष मनोज गंगणे, श्री फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर, अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी संचालक प्रशांत भगरे, मुंबई मराठी पत्रकार परिषद शाखा अक्कलकोटचे अध्यक्ष अरविंद पाटील, विश्वस्त संतोष भोसले, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष मनोज निकम, पत्रकार प्रविण देशमुख, प्रा.प्रकाश सुरवसे हे उपस्थित होते.
छत्रपतींच्या यथासांग महापूजा व आरती पुरोहित सोमनाथ कुलकर्णी यांच्याकडून संपन्न होवून पुजन करण्यात आले.
यानंतर श्री कमलाराजे चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन अमोलराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. या बरोबरच अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात वृक्षारोपण सोहळा देखील संपन्न झाला.
याप्रसंगी कोवीड-19 च्या सर्व त्या नियमांचे पालन करीत शिवराज्याभिषेक दिन उत्साहात व साधेपणाने साजरा करण्यात आला.
यावेळी वैभव नवले, संजय गोंडाळ, अप्पू पराणे, मनोज इंगुले, आकाश गडकरी, शहाजी यादव, संजय गोंडाळ, निखिल पाटील, अंकुश चौगुले, हिरा बंदपट्टे, ऋषी लोणारी, महेश लिंबोळे, अमित कोळी, दयानंद नडगिरे, आकाश चौगुले, अतिश पवार, हिमेश मंजुळकर, आदित्य धोत्रे, सत्तारभाई शेख, अभिजित सुरवसे, भरत राजेगावकर, प्रसाद मोरे, निखिल तोळणुरे, प्रथमेश पवार, स्वराज्य घाटगे, वैजनाथ मुकडे, किरण शिंदे, महेश पोतदार, डॉ.बसवराज बिराजदार, चंद्रकांत सोनटक्के, फहिम पिरजादे, वैभव मोरे, मुन्ना कोल्हे, अक्षय पवार, शंकर व्हनमाने, अनिल पवार, केदार तोडकर, नितीन शिंदे, कुणाल सुर्यवंशी, नितीन मोरे, गोटू माने, सोमशंकर जमशेट्टी, विशाल कलबुर्गी, सिध्दाराम कल्याणी, सुमित कल्याणी, ज्ञानेश्वर भोसले, आतिष पवार, आबा सुर्यवंशी, रोहित खोबरे, अप्पा हंचाटे, प्रदिप बणजगोळे, शिवा याळवार, संभाजी पवार, शिवसेना शहर उपप्रमुख तेजस झुंजे, प्रदीप सुरवसे, अमित थोरात, स्वामीनाथ बाबर आदीजण उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचलन प्रा.प्रकाश सुरवसे यांनी केले.