मुंबई : मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजी राजे यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. त्याला काल कोल्हापुरातून सुरुवात झाली आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजी राजे यांना आज बैठकीसाठी बोलविले होते.
छत्रपती संभाजी राजे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात तब्बल दीड तास चर्चा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील,मंत्री सतेज पाटील, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि मंत्रिमंडळातील इतर मंत्री उपस्थित होते.
या बैठकी नंतर छत्रपती संभाजी राजे यांनी पत्रकार परिषद घेतली, छत्रपती संभाजी राजे म्हणाले, आम्ही सरकारकडे सहा मागणी केल्या होत्या त्यातील आरक्षणाबाबत रिव्ह्यू पिटीशन दाखल करण्याचा मागणीला तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. सरकारकडून गुरुवारी रिव्ह्यू पिटीशन दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती छत्रपती संभाजी राजे यांनी दिली. त्याबरोबर विविध मागण्यांबाबत सरकारने आश्वासन दिले आहे, पण आपण मूक आंदोलन मागे घेतला नाही असेही त्यांनी सांगितले.