अक्कलकोट : महाराष्ट्र नाभिक महामंडळ मुंबई शाखा सोलापूरच्यावतीने गरजु कुटुंबाला धान्याचे किट वाटप महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष वैभव शेटे यांच्यावतीने अवकलकोट शहरातील नाभिक समाज बांधवांना वाटप करण्यात आले.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवक अध्यक्ष मनोज डिगे, सोलापूर शहर अध्यक्ष श्रीकांत राऊत, शहर युवक अध्यक्ष गणेश चौधरी, बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष प्रकाश शिंदे, पश्चिम महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष सुदर्शन विभुते, भागवत विभुते अवकलकोट शहर उपाध्यक्ष अमर सुरवसे, सचिव महेश सुरवसे,खजिनदार प्रविण राऊत, राजेश कोरे, आनंद दोरापल्ली, सुरेश चौधरी, संदिप राऊत ,व्यकंटेश विभुते, गणेश विभुते, अप्पाराव माने, लक्ष्मण विभुते, सुरेश काळे, महादेव भाले आदी समाज बांधव उपस्थित होते.