ध्यास विश्वसार्ह बातमीचा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांची तुफान गर्दी

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची प्रचंड मोठी गर्दी उसळलेली होती.

या गर्दीत कोरोना नियमांचं उल्लंघन करण्यात आलं. सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाला होता. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: कोरोना नियमावलीचं पालन करण्याचं आवाहन करतात. पण त्यांच्याच कार्यक्रमात कोरोना नियमावली पायदळी कशा तुडवल्या जावू शकतात? असा सवाल आता राज्यभरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील या मुद्द्यावरुन निशाणा साधला. “कोरोना व्हायरसची यांच्याशी चर्चा झाली असावी की जर तुम्ही गर्दी केली तरी मी तुमच्यावर हल्ला करणार नाही. लग्नात २५ जणांपेक्षा जास्त जण असले तर वधू-वरावर गुन्हा दाखल करतात. अशी ही अंधेर नगरी चौपट राजा, गजब सरकरकी अजब कहानी, या सरकारचे हे अजब मंत्री. एकीकडे गर्दी जमवतात दुसरीकडे ज्ञान सांगतात”, असं मुनगंटीवार म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!