---Advertisement---

पायात फाटक्या चपला असल्या तरी चालेल, आम्ही स्वाभिमान ढळू देणार नाही – मुख्यमंत्री

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : शिवसेनेच्या ५५व्या स्थापना दिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संभोधित केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुठल्याही राजकिय पक्षाचा नाव घेता जोरदार हल्लाबोल चढवला.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, काही जण स्वबळाचा नारा देत आहेत तसा आपणही देऊ. मात्र, स्वबळ म्हणजे नेमके काय हे आधी समजून घेतले पाहिजे. केवळ निवडणुकीसाठी स्वबळ असू नये. सगळ्याच बाबतीत ते असले पाहिजे. तुमच्यात आत्मविश्वास नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. म्हणून तलवार उचलण्याची ताकद आधी मनगटात येऊ द्या’, अशा शब्दांत काँग्रेसचा उल्लेख टाळून उद्धव ठाकरे यांनी तोफ डागली.

सत्तेसाठी शिवसेना कधीही लाचार होणार नाही, असे ठणकावताना उगाचच कुणाचीतरी पालखी वाहण्याची कामे शिवसेना करणार नाही. शिवसेनेचा जन्म हा न्याय हक्क मिळवून देण्यासाठी झाला आहे. म्हणूनच आम्ही चालू ते स्वाभिमानानेच. पायात फाटक्या चपला असल्या तरी चालेल, आम्ही स्वाभिमान ढळू देणार नाही. हीच आमची ताकद आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

करोना संकट आणखी किती काळ चालेल सांगता येत नाही. जवळची माणसं करोनाने हिरावून नेले आहे. अशावेळी सर्वांनी खरंतर एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून गंभीरपणे विचार केला गेला पाहिजे. तरीही कुणी स्वबळावर निवडणुका लढू असे म्हणत असेल तर लोक जोडे मारल्याशिवाय राहणार नाहीत. तुझं बळ तू वाढवणार आणि आम्हाला भीकेला लावणार हे खपवून घेणार नाही, असे लोक म्हणतील. अशा स्थितीत मी अराजक म्हणणार नाही पण एक अस्वस्थता उफाळून येईल, हे मात्र नक्की, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला.

★ शिवसेना 55 वा वर्धापन दिन

■ मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

◆ 55 वर्षांच्या वाटचालीच श्रेय ज्यांनी शिवसेना जोपासली त्या शिवसैनिकांच…. त्यांना सर्वप्रथम अभिवादन!आपल काम बोलतंय… अनेकांच्या पोटात त्यामुळे मुरडा येतोय. त्यांच ते पाहतील, त्यांना औषध द्यायला मी डॉक्टर नाही. पण राजकीय औषध देईन.

◆ अस भाषण करण कठीण… समोर आपले शिवसैनिक नसताना मी एकतर्फी बोलतोय.खर म्हणजे अनेक राजकीय पक्ष या कोरोना काळात सुद्धा स्वबळाचा नारा देत आहेत… आपणही देऊ. ताकद तर कमावलीच पाहिजे. पण स्वबळ म्हणजे काय?

◆ जे माझे आजोबा सांगायचे आणि शिवसेनाप्रमुख सांगायचे ते म्हणायचे आत्मविश्वास आणि आत्मबळ महत्त्वाच.
ज्या वेळी शिवसेना स्थापन झाली तेंव्हा मराठी माणूस क्षुल्लक होता… मान सोडाच परंतु अपमान सहन करत होता. शिवसेना तेंव्हा स्थापन झाली नसती तर…
स्वबळ म्हणजे फक्त निवडणूका लढणे नाही तर अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे म्हणजे स्वबळ..

◆ गेल्या निवडणूकीत जे दुर्दैवाने पराभुत झाले त्यांच्याशी मी संवाद साधला… त्यांना मी सांगितल पराभूत शब्द काढा, जो खचला तो संपला.संकटाला घाबरला तर तो शिवसैनिक कसला? संकटाच्या छाताडावर चाल करुन जाणे ही आपली शिकवण.

◆ जेंव्हा शिवसेनेवर संकुचितपणाचे, प्रांतवादाचे आरोप झाले तेंव्हा देखील शिवसेनाप्रमुख पूढे गेले…. ते स्वबळ.
स्थानिय लोकाधिकार समितीच्या शिवराय संचलन कार्यक्रमात मी जातो… त्या भागात चौफेर पाहतो. चौफेर पाहताना मोठमोठ्या ऑफिसकडे, इमारतींकडे, गच्चीतुन, खिडकीतुन, झाडावर चढुन लोक पहात असतात. हे अप्रुप आहे.

◆ पूर्वी या खिडक्या बंद होत्या, शिवसेनेने मराठी माणस तिथे घुसवली. मनगट आहेत पण त्यात ताकद नाही तर फायदा नाही. मराठी माणसाला शिवसेनाप्रमुखांनी तुझ्या मनगटात ताकद आहे तलवार पेलवण्याची ही जाणीव करून दिली तेंव्हा मराठी माणुस पेटुन उठला.

◆ टीका करणारे तुम्हीं काहीही केलत तरी टीका करणार…. तुमच्या मनाला जे पटत ते करा.

◆ हिंदुत्त्व हेच राष्ट्रीयत्त्व! सर्वप्रथम देशाभिमान मग प्रादेशिक अस्मिता.आपल्या हिंदुस्थानचा पाया हा संघराज्याचा भाषावार प्रांत रचनेचा आहे हे आपण विसरता कामा नये.

◆ देशाचा पाया हा प्रादेशिक अस्मितेचा आहे. जर या अस्मितेवर घाला आला तर संघराज्याच्या पायावर घाला होतोय.
आम्हीं एकमेकांना भेटल्यावर जय महाराष्ट्र बोलतो, पण ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’, देश आधी…

◆ महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले खरा वीर वैरी पराधीनतेचा
महाराष्ट्र आधार या भारताचा…

◆ या सेनापती बापटांच्या काव्यपंक्ती! ही ताकद महाराष्ट्राची आहे का? जरुर आहे.
बंगाल ने आज स्वत्व काय हे दाखवुन दिलंय…

◆ वंदे मातरम हा क्रांतीचा महामंत्र दिला…. त्याच बंगालने प्रादेशिक अस्मिता जपण्याचा मंत्र दिला.

◆ माझ्या आजोबांनी दिलेला हा वारसा आहे… हिंदुत्वाबद्दल सांगत असताना अनेकांचा गैरसमज होतो की महा विकास आघाडी म्हणजे हिंदुत्व सोडलं… ते काही पेटन्ट नाही कोणाचे. हिंदुत्व आमच्या हृदयात आहे.

◆ 55 वर्षे आपण जे राजकारण पाहिल त्यात जे दिग्गज राजकारणी होते… आताच्या नेत्यांची उंची कळतेय. या कोरोना च्या काळातही जे राजकारण चालले आहे ते राजकारणाचे विकृतीकरण होते, किंबहुना विद्रुपीकरण आहे.

◆ तुमच्यासारखे शिवसैनिक लाभणे हे माझे भाग्य… हे सर्व तुमच्या मेहनतीच आणि आशिर्वादाच फळ. तुमच्याशिवाय मी एक पाऊल काय, एक कणही पूढे जाऊ शकत नाही.

◆ आपल्या प्रशासनाची सुद्धा कमाल आहे…. पहिल्या, दुसर्‍या लाटेच्या आठवणी सुद्धा नकोशा वाटतात. फोन आला की धस्स होत असे. परंतु प्रशासनाची मेहनत, जनतेची मदत शिवसैनिकांची समाजसेवा इ. च हे फलित आहे.

◆ खुन खराबा करणे हा शिवसैनिकाची ओळख नाही परंतु अन्यायावर वार करणे आहे…. रक्तपात नाही तर रक्तदान करणे ही शिवसैनिकांची ओळख आहे. आरोप करणार्‍यांपैकी कितीजणांची ही ओळख आहे?

◆ हज्जारो शिवसैनिकांनी रक्तदान केले… तेंव्हा विचारत नाही की हे कुणाला दिल जाणार. हे शिवसेनेच हिंदुत्व
प्रत्येक आपत्तीत पहिला धावुन जातो तो शिवसैनिक… बदनामी करण सुरु आहे. जो आरोप करतोय तो कोण?
आम्हीं आमच्या रुबाबात जात आहोत… 55 वर्षे काही साधीसुधी नाहीत.
शिवसेना अजुनही एक एक पाऊल पूढे जात आहे…

◆ महाराष्ट्राचा अनुभव घेताना अन्य राज्याचा अनुभव काही फार वेगळा नाही… अजुन किती काळ हे संकट चालेल हे सांगता येत नाही. कोविड नंतर देखील पोस्ट कोविड तक्रारी आहेत.

◆ पोस्ट कोविड आरोग्यच्या तक्रारी आहेत परंतु अन्य देखील परिस्थिती उद्भवणार आहे… परिवारातील लोक निवर्तली आहेत, कर्ता माणूस गेला आहे, रोजगार गेले आहेत, अनेक रोजगार बुडाले आहेत.
रोजीरोटी मंदावली आहे… पोस्ट कोविड माझ काय होणार या एका चिंतेत देशवासी आहेत. अशा वातावरणात स्वबळ इ. देशवासी ऐकुन घेणार नाहीत. हा विचार आपण केला नाही तर अराजकता मोठा शब्द ठरेल परंतु अस्वस्थतेकडे चालला आहे.

◆ सर्व पक्षांनी राजकारण बाजुला ठेवुन जर अर्थकारणाची घडी बसवण्याकडे लक्ष नाही दिले तर ते योग्य नाही…
वर्धापन दिनी राजकीय कार्यक्रम देण्याऐवजी कोरोना मुक्तीचा कार्यक्रम देणारे कोणी नसतील…

◆ कोरोना मुक्ती हा एक उपक्रम न राहता चळवळ निर्माण व्हायला हवी… कोणत्याही गोष्टीत जोपर्यंत जनसहभाग येत नाही तोपर्यंत तो यशस्वी होत नाही.
कोरोनातुन बाहेर पडण्यासाठी प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्ती जोपर्यंत यात सहभागी होत नाही तोपर्यंत हे कठीण नाही तर अश्यक्य आहे.

◆ सत्तेसाठी लाचार होणार नाही, परंतु उगाचच कोणाची पालखी वाहणार नाही.
आम्हीं आमच्या पाऊलावर खंबीरपणे पुढे वाटचाल करू… ही शिवसेनेची ताकद, हे शिवसेनेचे ब्रीद!

शिवसेना ही एक संघटना नाही, तो एक विचार आहे… तो पूढे जात राहणार आहे. शतकानुशतके! जय हिंद, जय महाराष्ट्र!!

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!