ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या टिकेवर “या” नेत्यांनी दिली प्रतिक्रिया…!

मुंबई : शिवसेनेच्या ५५ वर्धापनदिनाच्या औचित्य साधून शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शिवसैनिकांशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेससवर नाव न घेता जोरदार टीका केली. त्यासोबतच विरोधी पक्ष भाजपवरही निशाणा साधला. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या टिकेवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मुख्यमंत्री यांनी ठाकरे शैलीत भाषण केलं आहे. मात्र ते कोणाला उद्देशून केलं आहे याची स्पष्टता नाही. त्यामुळे त्यांची स्पष्टता आल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देईल. भाजपनेही स्वबळाचा नारा दिला होता. प्रत्येक पक्षाला स्वातंत्र्य आहे, अस नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या टिकेवर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, शिवसेनेच्या वर्धापनदिनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि पक्ष प्रमुख या दोन्ही बाजूंची समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे असे म्हणाले. सुधीर मुनगंटीवार यांनी सडकून टीका केली. शिवसेना वर्धापन दिनाचे उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे सत्ता प्रमुखाचे नव्हे तर गँग प्रमुखाचे भाषण आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं की, दोन दिवसाआधी आपण गुंड आहोत म्हणून सांगितले. आता काँग्रेसला स्वबळाच्या नाऱ्यामुळे जोड्याने मारण्याची भाषा केली जात असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!