---Advertisement---

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहिलं आहे. प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात भाजपशी जुळवून घ्या, असा सल्ला त्यांनी दिला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

गेल्या आठवड्यात प्रताप सरनाईक यांच्याच मतदार संघात आमचे आमदार हरवले आहेत वो, तुम्ही आमच्या आमदारांना बघितलंत का? अशा आशयाचे बॅनर झळकले होते. 

यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी विचार केला तर आमचे वरिष्ठ नेते विचार करतील असं सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

शिवसेनेचे नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपशी जुळवून घ्या असं सांगत असतानाच, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कशी शिवसेनेला पोखरत आहेत आणि कमकुवत करत आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच महाविकास आघाडीतील काही मंत्री व काही सनदी अधिकारी केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा आपल्या पाठीमागे लागू नये. म्हणून केंद्रातील सत्ताधारी पक्षासह आपल्या नकळत छुपी हातमिळवणी करीत आहेत. हेही आपल्या निदर्शनास आणून देत आहे, असे प्रताप सरनाईक यांनी पत्रात म्हंटले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!