ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कोरोनाच्या सावटाखाली कारहुणवी (बैलपोळा) साजरा; यंदाच्या वर्षीही बैलांच्या मिरवणुका नाहीच!

गुरुशांत माशाळ,

दुधनी : देशभरातील सर्व सणा-सुदींवर कोरोनाचा सावट पडला आहे. सध्या देशात आणि राज्यात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्याने काही प्रमाणात अनलॉक करण्यात आले आहे. मात्र शसनाने निर्बंध कायम ठेवली आहे.

 

शेतकऱ्यांचा बैलावर प्रेम व्यक्त करणारा सण म्हणजे कारहुणवी होय… आता त्यावरही कोरोनाचे सावट पडले आहे. ग्रामीण भागात दरवर्षी कारहुणवी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कारहुणवी निमित्त शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असतो. त्यात विशेष करुन बाळगोपाळांच्या आनंदाला पार नसतो. शेतकर्यांच्या घरातील लहान मुले सकाळी लवकर ऊठुन बैल जोड्यानां साबण आणि शाम्पू लावून अंघोळ घालण्यापासुन बैल जोड्यांना सजविण्यासाठी मद्त करतात. कारण त्या क्षणाचा आनंद काही वेग़ळाच असतो. कारहुणवीच्या निमित्ताने त्यांचा किलबिल सकाळपासुन संध्याकाळ पर्यंत सुरुच असतं. मात्र यंदा कोरोनाचा सावटामुळे कारहुणवी साध्या पद्धतीने घरीच साजरी करण्यात आली. यामुळे लहानग्यांमध्ये यावर्षीही नाराजी प्रकर्षाने दिसत होती.

दरवर्षी बैल जोड्यांना सजावट केल्यानंतर प्रत्येक शेतकरी आपापल्या बैल जोड्यांना विधी, परंपरेनुसार पूजा करून, नैवेद्य दाखवून दुपारी बारावाजे नंतर गावातील शेतकरी आणि गावकरी आपापले पशुधन समवेत येथील मैंदर्गी नाक्याजवळील रुपा भवानी मंदीराजवळ एकत्र जमतात. त्यानंतर पारंपारीक वाद्यसमवेत वाजत-गाजत, हलगीच्या कडकडाट करत नाचत शहरातील प्रमुख मार्गावर बैल जोड्यांचा मिरवणुक काढतात.त्यानंतर दुपारी चार दरम्यान गांधी चौकातील नगर परिषदेपासुन हनुमान मंदिरापर्यंत बैल जोड्यांचा शर्यत लावलं जातं. त्यानंतर गावच्या पोलीस पाटलांच्या समक्ष बैल जोड्यांचा कर तोडलं जातं.ज्यांच्या बैल जोडीने कर तोडलं त्यांच्या घरी रात्री चहापानाचा मोठं कार्यक्रम आयोजित करण्यात येतं. मात्र शासनाच्या आदेशानुसार यंदा मिरवणुका, शर्यंतींवर सद्या बंदी असल्याने यावर्षीही बैल जोड्यांचा मिरवणुका काढले गेले नाही आणि शर्यंतीही लावली गेली नाही.

दुधनी शहर हे कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर वसलं आहे. सीमावर्ती भागात कारहुणवी सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण यंदा या सणावर कोरोनाचे सावट असल्याने साधेपणाने साजरा करण्यात आला. मागील काहि दिवसांपासून दुधनी आणि परिसरात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण आहे. संपुर्ण जुन महिना लोटला तरी अद्याप मोठा पावुस पडला नाही. त्यामुळे या परिसरातील खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतातील मशागतीच्या कामे पूर्ण झाली आहेत. बी-बियाणे, खत खरेदी झाली आहे. शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आकाशाकडे बघत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!