ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यात सत्ता बदलली तरी मोर्चे काढत राहणार ; नरेंद्र पाटलांचा सोलापुरात इशारा

सोलापूर : राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून राजकिय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्‍वभूमीवर सोलापुरात चार जुलैला आक्रोश मोर्चा निघत आहे या मोर्चाला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे तरीही हा मोर्चा निघणारच असा निर्धार अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सोलापुरात बोलताना केला आहे.

पाटील हे मागच्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात मोर्चा संदर्भात वातावरण निर्मिती करत आहेत. मोर्चा दोन दिवसावर येऊन ठेपला नाही आज त्यांची पत्रकार परिषद झाली.  यावेळी त्यांनी हे भाष्य केले.  सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्दचा निर्णय व केंद्राने राज्यांना अधिकार असल्याचे म्हणणारी दाखल केलेली याचिका फेटाळल्यामुळे मराठा आरक्षणाच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे.

★ येत्या काही महिन्यांत राज्यात सत्तांतर झाले तरी आम्ही मोर्चा काढणार 

सोलापुरात 4 जुलै रोजी मराठा क्रांती आक्रोश मोर्चा निघणार आहे. शरद पवारांचा काळ, काँग्रेस-राष्ट्रवादीचा आघाडीचा काळ पाहिला तर त्यांचा द ग्रेट मराठा असा उल्लेख होतो. परंतू शरद पवारांनी मराठ्यांच्या बाजूने भूमिका घेतलेली नाही. यामुळे पवारांनी मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करावी. आरक्षण रद्द झाल्यानंतर शरद पवारांनी काहीही भूमिका घेतली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. केंद्रीय कायदा मंत्री यांची भेटीसाठी वेळ घेऊन त्यांना मराठा आरक्षणाबाबत कायदा करण्यासाठी विनंती करणार आहे, असे ते म्हणाले. काही झाले तरी मोर्चा निघणारच, असे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!