---Advertisement---

खुशखबर ! सोलापूरहुन मुंबईसह गोव्याला विमानाने जाता येणार

By team
On: November 25, 2024 7:14 PM
Follow Us:
---Advertisement---

 

सोलापूर वृत्तसंस्था 

सोलापूरांसाठी आनंदाची बातमी आहे. सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-गोवा या थेट हवाई मार्गांचे फ्लाय91 कंपनीचे तिकीट दर जाहीर झाले आहे. या नव्या सेवेमुळे सोलापूरकरांना विमान प्रवासाचा जलद आणि आरामदायी पर्याय मिळणार आहे. सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय कुंदन जाधव यांनी फ्लाय 91 कंपनीच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात इ-मेलद्वारे माहिती मागितली होती. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

सोलापूर ते मुंबई थेट मार्गावर तिकिटांचा प्रारंभिक दर फक्त 1488 रुपयांपासून सुरू होतो. विविध स्लॅबमध्ये दर वाढत जातात, जे प्रवाशांच्या मागणी आणि उपलब्धतेनुसार ठरवले जातात. उच्चतम दर 9584 रुपयांपर्यंत आहे. अतिरिक्त शुल्कात 217 रुपये युजर डेव्हलपमेंट फी (UDF), 236 रुपये विमान सुरक्षा शुल्क (ASF) आणि 5% GST यांचा समावेश होतो.

सोलापूर ते गोवा थेट मार्गावर तिकिटांचा प्रारंभिक दर फक्त 689 रुपये आहे. या मार्गावरही स्लॅबनुसार दर 8785 रुपयांपर्यंत जातात. अतिरिक्त शुल्कातही UDF, ASF, आणि GST चा समावेश आहे, जो मुंबई मार्गाप्रमाणेच आहे.

सोलापूर विमानतळाच्या या सेवेमुळे प्रवाशांना जलद आणि किफायतशीर प्रवासाचा आनंद घेता येणार आहे. या मार्गावर महाराष्ट्र शासनाच्या व्हायबिलिटी गॅप फंडिंग आणि ‘रीजनल कनेक्टिव्हिटी योजना’ (RCS) अंतर्गत विमान सेवा देण्याचा प्रस्ताव केंद्रात असल्याने काही मार्गांवर फक्त GST लागू होतो, ज्यामुळे प्रवास अधिक परवडणारा ठरतो.

 

मुंबई ते सोलापूर

निघण्याची वेळ : सकाळी 11:55

पोहोचण्याची वेळ: दुपारी 1:45

 

सोलापूर ते मुंबई

निघण्याची वेळ: सकाळी 9:40

पोहोचण्याची वेळ: सकाळी 11:20

 

—–

 

गोवा ते सोलापूर

निघण्याची वेळ: सकाळी 8:00

पोहोचण्याची वेळ: सकाळी 9:10

 

सोलापूर ते गोवा

निघण्याची वेळ: दुपारी 2:15

पोहोचण्याची वेळ: दुपारी 3:30

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!