अक्कलकोट, दि.१५ : अक्कलकोट शहर आणि तालुक्यात परतीच्या पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढल्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे.या पार्श्वभूमीवर मोट्याळ गावामध्ये पाणी शिरले
असून त्यांच्या कायम पुनर्वसनाची मागणी करण्यात येत आहे.पाच सहा वर्षा असा विचार झाला होता पण प्रशासनाकडून पुढे कार्यवाही झाली नाही ती करणे गरजेचे आहे,असे माजी सरपंच कार्तिक पाटील यांनी सांगितले.दोन दिवसांपासून कुरनूर धरणातून बोरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
हा विसर्ग इतका मोठा आहे. की मोट्याळ गावालगत असलेली बोरी नदी तुडूंब भरून आल्याने गावामध्ये पाणी शिरले आहे.
तात्काळ रातोरात तेथील नागरिकांना स्थलांतरित केल्यामुळे जीवित हानी टळली असून जिवाच्या भीतीने हातात सापडेल ते घेऊन अंधारात धावत लोक सुरक्षित ठिकाणी गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. घरातील सर्व वस्तूची मात्र मोठ्या प्रमाणात नासधूस झाली असून महत्वाची कागदपत्रे, अन्न धान्य भिजले आहे व वाचनालय मध्ये पाणी शिरले आहे. सर्व विद्युत उपकरणे पाण्यात पोहताना दिसत आहेत व घरातील सर्व वस्तूची नासधूस झाली आहे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. येथील पंचनामा करून लवकरात लवकर मदत मिळावे व गाव पुर्नवसन व्हावे अशी येथील नागरिकांची मागणी आहे.