म्हैसूरु : कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार हे सद्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत. या व्हिडीओमुळे काँग्रेसचे संकट मोचक समजले जाणारे काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. खांद्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पक्षाच्या एका कार्यकर्त्याला त्यांनी जोरात थप्पड लगावली आहे.
काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार हे मंड्यामध्ये माजी मंत्री जी. मंडेगौडा यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेले होते. चालत येत असताना एका कार्यकर्त्याने त्यांच्या खांद्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला. तर दुसरा कार्यकर्ता सेल्फी घेत होता. त्यावर संतापलेल्या डी. के. शिवकुमार यांनी खांद्यावर हात ठेवणाऱ्या कार्यकर्त्याला जोरात थप्पड मारली. डी. के. शिवकुमार यांच्यासोबत पक्षाचे कार्यकर्ते चालत असताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.
𝗙𝗼𝗹𝗹𝗼𝘄👉 @trendingstudents77 𝗙𝗼𝗿 𝗟𝗮𝘁𝗲𝘀𝘁 𝗡𝗲𝘄𝘀 𝗨𝗽𝗱𝗮𝘁𝗲'𝘀 📰🗞
Karnataka Congress President DK Shivakumar Slaps a Party Worker
The Man Was Trying to Put His Hand on His Shoulder#congress #ViralVideo #BREAKING pic.twitter.com/B9q0RpuF8I
— Trending Shots (@TrendingShots_) July 10, 2021
यावेळी नीट वागा, असे डी.के. शिवकुमार यांनी त्या कार्यकर्त्याला सुनावले. थप्पड मारत असल्याचा व्हिडिओ कार्यकर्त्यांनी मोबाईलमधून काढून टाकण्याची सूचनाही शिवकुमार यांनी दिली होती. पण, कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाक्षध्यक्ष कार्यकर्त्याला थप्पड मारत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमात चांगलाच व्हायरल झाला आहे.