नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पाळत ठेवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर नाना पटोले यांच्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेस नेते, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन प्रतिहल्ला केला.
आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण देऊन पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. नाना पटोले म्हणाले की, आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा पटोले यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी अनेक प्रकारच्या कहाण्या रचले जात आहेत. अशा प्रकारच्या घाणेरड्या राजकारण करून सरकारमध्ये फूट पाडण्याचा डाव सद्या राज्यात सुरू आहे. पण विरोधकांचा हा डाव यशस्वी होणार नाही. अशा शब्दात नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली.