अक्कलकोट, दि.१२ : अक्कलकोट शहरातील मुजावर गल्ली येथील ग्रामदैवत हिंदू मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान हजरत पीर ख्वाजा दाऊद दर्गाचा यंदाचा दि.१४, १५, १६ जुलै रोजी होणारा उरूस कोरोनामुळे रद्द करण्यात आल्याची माहिती दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष एजाज मुतवल्ली यांनी दिली.
या तीनही दिवशी दर्गाह भाविकांसाठी बंद असल्याने भाविकांनी दर्गा परिसरात नैवेद्य घेऊन न येता आपल्या घरीच प्रार्थना करुन साजरा करून सहकार्य करावे,असे आवाहन संस्थापक अध्यक्ष हाजी नसरोद्दीन मुतवल्ली यांनी केले आहे. उरूस निमित्त दर्गा परिसरात मात्र विद्युत रोषणाई करण्यात आली असून सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत. फक्त धार्मिक विधी करून पार्सल महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.
याप्रसंगी दर्गा ट्रस्टचे विश्वस्त खलिलअहमद मुतवल्ली, सैपन मुजावर, माजिद गौर, इम्रान मुतवल्ली, मझहर मुजावर सह सत्तार बिराजदार, मुनिर मुतवल्ली, अस्लम बोरोटी आदी उपस्थित होते.










