सोलापूर,दि.14: राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतीसाठी अर्थसहाय देण्याची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी कार्यालयाने केले आहे.
योजनेंतर्गत नवीन विहीर खोदण्यासाठी अडीच लाख रूपयांचे अनुदान निश्चित केले आहे. योजनेसाठी महाडीबीटी पोर्टल https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावरून शेतकऱ्यांनी अर्ज करावयाचे आहेत. पोर्टलवरील लाभार्थ्यांचे सोडतीतून निवड प्रक्रिया व निवड झालेल्या लाभार्थ्यांना अनुदान देण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येणार आहे.
पात्रटेच्या अटी
लाभार्थी हा अनुसूचित जमातीचा शेतकरी असावा. नवीन विहीरीसाठी कमीत कमी 40 आर आणि जास्तीत जास्त सहा हेक्टरपर्यंत जमिनींची मर्यादा आहे. ज्या शेतकऱ्यांना इतर घटकाचा लाभ द्यावयाचा आहे, त्यांच्यासाठी त्यांच्या नावे किमान 20 आर क्षेत्र असावे. शेतकऱ्यांचे सर्व मार्गांनी मिळणारे उत्पन्न दीड लाख रूपयांच्या जास्त नसावे. लाभार्थ्यांची निवड ग्रामपंचायतीच्या ग्राम सभेमध्ये झालेली असावी.