दिल्ली : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवार यांच्यात जवळपास एक तास चर्चा झाल्याची माहीती आहे. या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाकडुन ट्वीटकरुन माहिती देण्यात आली आहे.
भेटीमागच नेमक कारण अद्याप कळु शकले नाही. मात्र या भेटीमुळे राज्यात राजकीय उलथा-पालथ होणार की काय? अशी शंका राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
राज्यसभेचे अध्यक्ष पियुष गोयल यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली होती. आता शरद पवार यांनी पंतप्रधानांसोबत तासभर खलबत केल्यानंतर राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. ही भेट दिल्लीत साऊथ ब्लॉकमधील पंतप्रधानांच्या कार्यालयात झाली.
Rajya Sabha MP Shri Sharad Pawar met PM @narendramodi. @PawarSpeaks pic.twitter.com/INj26CLl0k
— PMO India (@PMOIndia) July 17, 2021