ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सुशीलकुमार शिंदे, सुभाष देशमुख यांच्या हस्ते झाला दोन नामवंत संपादकांचा सत्कार

सोलापूर : लोकमतचे माजी संपादक राजा माने आणि सुधीर महाजन या दोन संपादकांचा शुक्रवारी सोलापुरातील हेरिटेज गार्डन मध्ये माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते मानपत्र देऊन सपत्नीक गौरव करण्यात आला. या सोहळ्यास विविध दैनिकातील संपादक पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी सुधीर महाजन आणि राजा माने यांच्या पत्रकारितेचे कौतुक केले लोकमत दैनिकाने आजवर तोडण्याचे नाही तर जोडण्याचे काम केले असे सांगितले लोकमत चा प्रवास मला माहित आहे असं सांगत त्यांनी जवाहरलाल दर्डा तसेच राजेंद्र दर्डा यांच्या कामगिरीचे कौतुक केले.

माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी शिंदे साहेब हे सोलापूरचे राजकीय बाप आहेत त्यामुळे सोलापूरचं मार्केटिंग करण्यासाठी तुम्ही सिद्धेश्वर च्या गड्डा यात्रे यात्रेला नामवंत लोकांना, चित्रपट अभिनेत्यांना आणा तसेच परदेशातील व्यक्तींना देखील सोलापुरात आणा. आपले खूप मोठ मोठ्या नेत्यांना बरोबर चांगले संबंध आहेत आपल्या पत्राला चांगले वजन आहे त्यामुळे सोलापूरचे चित्र बदलण्यासाठी आपण आदेश द्या त्याप्रमाणे काम करू असे देशमुख म्हणाले.

सत्काराला उत्तर देताना राजा माने यांनी आई-वडिलांच्या आठवणींना उजाळा देत लोकमतने भरभरून दिलेल्या प्रेमाचे ऋण व्यक्त केले तसेच बाबा दळवी आणि राजेंद्र दर्डा यांनी केलेल्या संस्काराची आठवण करून दिली.

सत्काराला उत्तर देताना सुधीर महाजन म्हणाले की, मी औरंगाबादचा असलो तरी सोलापूर पण माझे खूप प्रेम आहे माणसातील माणूस पण या सिद्ध रामेश्वराच्या भूमीत टिकून आहे. प्रारंभी शिवाजी सुरवसे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. दत्तात्रय थोरे यांनी सडेतोड मनोगत व्यक्त करत उपस्थितांची मने जिंकली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी केले तर चन्नवीर मठ यांनी आभार प्रदर्शन केले.

या कार्यक्रमास लोकमतचे संपादक सचिन जवळकोटे, व्यवस्थापक रमेश तावडे, सकाळचे संपादक अभय दिवाणजी, सूराज्यचे संपादक राकेश टोळे, BR चे मनीष केत, इन न्यूजचे समाधान वाघमोडे, सुधाकर इंगळे महाराज, माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, सोलापूर आकाशवाणीचे
सहाय्यक संचालक सुनील शिनखेडे,
भाजपचे शहाजी पवार, इंद्रजीत पवार ,अविनाश महागावकर, उद्योजक गिरीश दर्बी, रवींद्र चिंचोळकर,नगरसेवक आनंद चंदनशिवे, विनोद भोसले, चेतन नरोटे, संगीता जाधव ,माऊली पवार, रुपश्री येवलेकर, चंद्रिका चव्हाण, मातृभूमी प्रतिष्ठानचे संतोष ठोंबरे, सावा संघटनेचे महेश अंदेली ,सुधा अळीमोरे, अमोल जोशी सायली जोशी, रॉकी बंगाळे, एडवोकेट धनंजय माने, पद्माकर कुलकर्णी मारुती कटकधोंड, पराग शहा, यांच्यासह गौरव समितीचे शंकर जाधव प्रमोद पाटील संतोष उदगिरी किशोर रच्चा, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!