ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सीना नदीला पूर आल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड गाव पाण्यात

 

दक्षिण सोलापूर,दि.१७ : दक्षिण सोलापूर तालुक्याला भिमा आणी सीना नदीच्या महापूरामुळे अनेक भागांमध्ये पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झाली आहे . चित्रा नक्षत्राच्या पावसाने पूर्ण राज्यभर पावसाने हजेरी लावून सर्व धरण, तलाव ,नदी ,नाले ,ओढे भरून वाहत आहेत . त्यामुळे सिंदखेड येथील सीना नदीने रौद्ररूप धारण करून नदीकाटच्या गावाला पूर्णपणे घेरट घातलेला आहे. चालू काळात जुन्या नागरिकांना विचारपूस केली असता सुमारे तीस ते पस्तीस वर्षांनंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात महापूर आला आहे असे सांगत आहेत .

सिंदखेड येथील सीना नदी हे पूर्णपणे पाण्याखाली वाहून चारही बाजूने गावाला वळसा घातलेला आहे.गावबंदी अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही देखील झाले आहे . तसेच त्यांना त्यांच्या घरातील लोकांना जिल्हा परिषद शाळा हनुमान मंदिर ग्रामपंचात येथे हलवण्यात आले आहे. तसेच गावातील वीस ते तीस लोकांच्या नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सीना नदीला मोठय़ा प्रमाणात पुर आल्याने सिंदखेड येथील आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांचे घरे ,जनावरे , अनेक पिके पाण्याखाली वाहून गेलेला आहे.

शेतात असलेल्या पिकांचे नुकसान देखील मोठ्या प्रमाणात झाले आहे . चारी बाजूने घेरटा घातलेल्या पाण्यामुळे गावातील नागरिकांना रात्री चांगलाच झोप उडाला आहे .तसेच आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांचे नवीन घरातील पाण्यामध्ये अडकलेला आहेत . चंद्राळ येथील शेतात असणाऱ्या पिरसाब मोदींना शेतसंधी यांच्या घरातील एकूण संख्या तीस एवढे असून या कुटुंबीयांना पाण्यात अडकलेल्या होते . यांना एनडीआरएफ पथकाने कथक परिश्रम घेऊन त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आला आहे .

या महापुरामध्ये नजीकच्या शेतकरी वर्गाचे अतोनात नुकसान झालेला आहे. मुख्य म्हणजे या ठिकाणी पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी सुद्धा आलेल्या अधिकारी लोकांना येण्यासाठी मार्गदेखील बंद असल्याने पूर परिस्थिती पाणी करता आलेला नाही . दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुख्य पीक ऊस, द्राक्षे, केळी, तूर ,भुईमूग आदी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झालेले आहे .नुकसान झालेले शेतकऱ्यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत .

पावसाने पुरामुळे ठिकठिकाणी विद्युत खांब पडल्याने टाकली भागातील सिंदखेड, होनमुर्गी राजूर ,बिरनाळ, हत्तूरसंग, कुडल, बरूर, आैराद या भागातील देखील नागरिकांचे हाल होत आहेत .

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!