---Advertisement---

अतिवृष्टीग्रस्त भागाच्या भेटीसाठी अमित देशमुख  १८ आणि १९ ऑक्टोबरला लातूर व उस्मानाबाद जिल्हयात

Follow Us:
---Advertisement---

 

लातूर,दि.१७ : राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख दि. १८ ते १९ आँक्टोंबर दरम्यान दोन दिवसाच्या लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून या काळात ते अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकरी वर्गाशी संवाद साधून दिलासा देतील.
अतिवृष्टी आणी परिणामी नदयांना आलेल्या पूरामुळे लातूर व ऊस्मानाबाद जिल्हयाच्या काही भागात खरीप पिकांचे व शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख हे रविवार व सोमवार दोन दिवस लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त भागाला भेटी देऊन पाहणी करणार आहेत. यावेळी शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्यांना दिलासा देतील.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!