ध्यास विश्वसार्ह बातमीचा

घोळसगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील घोळसगाव येथे श्री शंभू महादेव विद्यामंदिर येथे दहावी परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष मनीषा भांजे तसेच कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार व सन्मान करण्यात आला.

२०२०-२१ शैक्षणिक वर्षाचा शालांत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. प्रशालेतील दोन्ही माध्यमांच्या मुलांनी बाजी मारली मराठी माध्यमातून कुमारी पूजा शिवलिंगप्पा उमाटे ९६.८० गुण मिळाले व ती प्रशालेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. द्वितीय क्रमांकाने पूत्रप्पा हणमंत यळसंगे ९०.८०, पाटील समर्थ बसवराज ९०.८०,तृतीय क्रमांक अशितोष मल्लिनाथ हंद्राळे ८८.६० यांनी पटकविला तसेच कन्नड माध्यमातून निकिता श्रीशैल कत्ते ९४.८० गुण मिळाले व ती कन्नड माध्यमातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. द्वितीय मठपती अनिलकुमार सिद्धय्या ९२.८० व तृतीय क्रमांक सुतार मोनेश लिंबाजी ९१.८० गुण घेऊन उत्तीर्ण झाले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे केंद्रप्रमुख बापूसाहेब चव्हाण, इरणा आलुरे, जि प कन्नड मुख्याध्यापक नागुरे, अमीनभावी, स्वामी ,चव्हाण, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष राजेंद्र काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!