ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या अंत्यदर्शनाला लोटला जनसागर, अनेकांना अश्रु अनावर

सांगोला : तब्बल 50 वर्ष राज्याच्या विधानसभेत आमदार म्हणून आपली कारकिर्द गाजविणारे, अभ्यासू नेते, राजकारणातील अजातशत्रू, अत्यंत साधं व्यक्तिमत्व असलेले ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचा दीर्घ आजाराने काल रात्री९.३०च्या दरम्यान निधन झालं. त्यांनी वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने राजकारणातील वटवृक्ष हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार असून, गणपतराव देशमुखांच्या अंत्यदर्शनाला जनसागर लोटला आहे. गणपतराव देशमुख यांचा अखेरचा निरोप घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

गणपतराव देशमुख यांचा जन्म 10 ऑगस्ट 1926 रोजी झाला. अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतराव देशमुख यांनी तब्बल 54 वर्षे सांगोला मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे.

गणपतराव देशमुख यांचे पार्थिव कृषी उत्पन्न बाजार समिती समोर अंत्यदर्शनासाठी समोर ठेवण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी “अमर रहे अमर रहे, भाई गणपतराव देशमुख अमर रहे”च्या घोषणा दिल्या.

एकाच मतदारसंघातून विधानसभेवर सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा विक्रम शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या नावावर आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून 11 वेळा त्यांनी विक्रमी विजय मिळवले होते.

गणपतराव देशमुख यांच्या पार्थिवावर शेतकरी सहकारी सूत गिरणीच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अमर रहे, अमर रहे, आबासाहेब अमर रहेच्या घोषणा देण्यात आल्या. गणपतराव देशमुख यांचा चिरंजीव पोपटराव देशमुख यांनी दुपारी पावणेतीन वाजता मुखाग्नी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!