---Advertisement---

प्रल्हाद मोदी यांच्या टीकेच्या धागा पकडत काँग्रेसनेही साधला पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू आणि अखिल भारतीय रास्त भाव दुकान संघटनेचे उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. त्या ठिकेवरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये अडचणीत सापडलेल्या व्यापाऱ्यांचे प्रल्हाद मोदी यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांना आवाज उठवण्याचे आव्हान केले. ‘नरेंद्र मोदी असो की आणखीन कोणी, त्यांना तुमचं ऐकावा लागेल. “आपण लोकशाहीत राहतो गुलामगिरीत नाही”, असे म्हणत प्रल्हाद मोदी यांनी व्यापाऱ्यांना जीएसटी न करण्याचा सल्ला दिला आहे. उल्हासनगरमध्ये व्यापार्यांच्यावतीने कार्यक्रम घेण्यात आला. त्या कार्यक्रमात प्रल्हाद मोदी बोलत होते.

खोट्या बाता, खोटी प्रतिमा, खोटी आश्वासने व खोटं गुजरात मॉडेल सगळं खोटं ! मोदींची राजकीय इमारतच प्रॉपगाडांवर उभी आहे, असं ट्विट काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

सचिन सावंत आपल्या ट्विटमध्ये असं म्हटल आहे की, खोट्या बाता, खोटी प्रतिमा, खोटी आश्वासने व खोटा गुजरात मॉडेल, सगळं खोटं! मोदींची राजकीय इमारतच प्रॉपगाडांवर उभी आहे. त्यावर भूलून मत दिल्यावर हात रीतेच राहणार. मोदींचा भाऊ प्रल्हाद मोदी म्हणाले की, मोदींनी कधी चहा विकला नाही. पण स्वतःला चायवाला सांगून मोदींनी देशाला मूर्ख बनवलं. असं ट्विट काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!