ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दुधनीतील शांतलींगेश्वर उद्यानाची दूरवस्था, नरगपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष

गुरुशांत माशाळ
दुधनी : अरे कुठे नेवून ठेवलाय बगीचा माझा? म्हणण्याची वेळ शहरातील बालगोपाळांवर आली आहे. भाजीपाला मार्केट येथील श्री शांतलिंगेश्वर उद्यानाची मोठी दुरावस्था झाली आहे. उद्यानामध्ये कचरा टाकण्याची कचरा कुंडी, डुकरे, म्हैस चारण्यासाठी कुरण, आणि मुख्यतः तळीरामांसाठी दारू अड्डा, जुगार खेळणार्यासाठी जुगार अड्डा, आणि अवैध धंदा करण्यासाठी आश्रयस्थान बनले आहे.

वीस- बावीस वर्षांपूर्वी या उद्यानात शाळकरी मुलं-मुली वनभोजनासाठी यायचे, मनसोक्त खेळून आनंद लुटायचे, त्यावेळी उद्यानात हिरवागार गवत, विविध प्रकारच्या शोभेच्या झाड, विसावा घेणाऱ्यांसाठी कट्ट्या होत्या, स्वच्छ पाणी वाहणार नाला होतं, बालगोपाळाकरिता विविध साहित्य होत्या, सद्याही खेळणी साहित्य आहेत मात्र त्याची अवस्था दयनीय झाली आहे. संरक्षक भिंत पडली आहे. उद्यानाला संरक्षक भिंत नसल्याने या ठिकाणी अवैध धंदे सुरु आहेत. याला त्वरीत आळा घालण्याची मागणी या परिस्थितील नागरिकांमधून केली जात आहे.

या उद्यानातील वस्तूंची दुरुस्ती व विविध फुलांची झाडे व सुशोभिकरण करण्याबाबत गतवर्षी विविध सामाजिक संघटनेकडून निवेदन देवून सुध्दा नगरपालिकेने याकडे कानाडोळा केली आहे. या उद्यानाच्या दुर्दशेला जितकं नगरपालिका जबाबदार आहे. त्यापेक्षा अधिक जवाबदार शहरातील नागरिकही जवाबदार आहेत.

मात्र सौंदर्य वाढविण्याऐवजी येथील उद्यान अक्षरक्ष: कचरा कुंडी बनल्या आहेत. उद्यानामध्ये शेळी, डुकरे, कुत्रे, जनावरे, फिरत आहेत. उद्यनात ठिक-ठिकाणी विष्टा करण्यात आले आहे. कचरा भरून गेले आहे. काटेरी झाडे वाढले आहेत. या ठिकाणी प्लॅस्टीकचे ग्लास, तळीरामांनी टाकलेले बाटल्या, काचा, नाल्यामध्ये दगड, माती साचले आहेत. कट्ट्या पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत आहेत.

उद्यानात शहरातील महिला बालगोपाळ, नातेवाईकांना घेऊन, शाळकरी मुलं-मुली, जावे अशी स्थिती राहिलेली नाही. येथील वृक्ष, झाडी नष्ठ झाली आहेत. उद्यानाची देखभाल, स्वच्छता, झाडलोट, वृक्षांचे जतन याकरिता पालिकेने साफ दुर्लक्ष केल्याचे दिसुन येते. नगरपालिकेच्यावतीने उद्यान विभागासाठी दरवर्षी निधीची तरतूद केली जाते, सदरील निधी जाते तरी कुठे? याकडे पालिकेचे अधिकारी, मुख्याधिकारी, या प्रभागातील नगरसेवक यांचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. तरी याकडे संबंधित नगरसेवकांनी त्वरित लक्ष द्यावे आणि उद्यानाची दुराअवस्था त्वरीत दुर करावी अशी मागणी होत आहे.

त्या सोबतच शहरातील उद्यानांना नावे देताना देवी-देवता, समाजसुधारक, राजकीय नेते-पुढारी, सिने अभिनेते/अभिनेत्री यांचे नावे देऊ नये. कारण अशा प्रकारच्या ठिकाणांना त्यांचे नावे देऊन त्या ठिकाणी अशा प्रकारच्या दुरवस्था करून, अवैध कामांसाठी वापर होत असेल तर त्या समाजसुधारकांचे, देवी-देवतांचे, राजकीय नेते-पुढाऱ्यांचे, सिने तारकांच्या नावाची एक प्रकारे तो अवमान होणार आहे. तरी या उद्यानाला “नगर परिषद उद्यान” किंवा “शासकीय उद्यान” असे नामकरण करण्यात यावी अशी मागणी व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!