जिल्ह्याच्या विकासाला बळ देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट – खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी
सोलापूर : सोलापूरच्या चोहोबाजूंनी राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. त्याचप्रमाणे विजयपुर रोडवरील टाकळी कोर्सेगाव मार्गे अक्कलकोट ला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गा, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती समोर उड्डाण पुलासह विविध मागण्यांचे निवेदन दिले.याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना सोलापूरच्या विकासाला गती देण्याची मागणी खा.डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केली.
संसदीय अधिवेशन काळात खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी सोलापूर जिल्ह्यातील सुरू असलेले काम तसेच प्रस्तावित कामाबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.
याप्रसंगी सोलापुरातील राष्ट्रीय महामार्ग कामाच्या बाबत चर्चा केली. विशेषतः दिलेल्या निवेदनात विविध कामांचा समावेश केला. यामध्ये टाकळी – बरुर – कोर्सेगाव- तडवळ – करजगी -जेऊर – अक्कलकोट NH 150 E हा राष्ट्रीय महामार्ग घोषित करावा. त्यासह या कामास लवकरात लवकर मंजुरी देण्याची मागणी केली.
तसेच सोलापूर शहरातील अवजड वाहनांची रहदारी दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याचा शहरवासीयांना त्रास होत आहे. त्यामुळे सोलापूर – हैदराबाद रोडवरील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती (मार्केट यार्ड) समोर नवीन उड्डाण पूल करण्याबाबत मागणी केली आहे. विशेषतः सोलापुरात येणारे अवजड वाहनांना रिंग रोड मार्फत होण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग NH 9, NH 13, NH 211, NH 150 E, NH 166, या सोलापुरातील हैदराबाद, अक्कलकोट, विजयपुर, पुणे, सांगली कडे जाणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्गास जोडण्यासाठी रिंग रोड होण्याबाबत स्वतंत्र निवेदन दिले.
या सर्व मागण्यांबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक चर्चा करीत सोलापूरचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.