ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अखेर गोपीचंद पडळकरांनी पोलीसांना चकवा देत घेतली बैलगाडी शर्यत

 

सांगली : भाजप आमदार पडळकर यांनी आयोजित केलेलं बैलगाडी शर्यत पोलिसांना चकवा देत आटपाडी तालुक्यातील झरे येथे आज गनिमी काव्याने घेतली. हि बैलगाडी शर्यत निश्चित स्थळा ऐवजी वाक्षेवाडी पठरावर बैलगाडी शर्यत घेण्यात आली. बैलगाडी शर्यतीला उच्च न्यायालयाची बंदी असल्याने जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी या बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली होती.

यासाठी आटपाडी तालुक्यातील नऊ गावांमध्ये जमावबंदी आदेश देखील लागू करण्यात आला होता. झरे गावाकडे जाणारे सर्व रस्ते प्रशासनाने बंद केले होते. शर्यंत होणारी जागा देखील प्रशासनाने काही कालावधीसाठी जप्त केली होती. असे असताना देखील आमदार पडळकर यांनी ही शर्यत होणार असे सांगितले होते.

यावेळी पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त आणि झरे गावाला वेढा असताना पोलिसांनी चकवा देत गावाच्या बाहेर माळरानावर गनिमी काव्याच्या नितीने बैलगाडी शर्यत पार पाडली. या स्पर्धेच्या ठिकाणी शेकडो बैलगाडी समर्थक उपस्थित होते. तसेच गनिमी कावा पद्धतीने यशस्वीरित्या ही बैलगाडी शर्यत पार पडल्याने आमदार पडळकरांच्या समर्थकांनी आणि बैलगाडा शर्यत प्रेमींनी यावेळी एकच जल्लोष केला.

पोलीस आणि बैलगाडी प्रेमी आमने-सामने.. स्पर्धा पार पडल्या नंतर या ठिकाणी मोठ्या संख्येने पोलीस दाखल झाले, त्यानंतर पडळकर समर्थक आणि पोलीस आमने-सामने आल्याने या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आमदार पडळकर यांनी या ठिकाणी दाखल होत, सर्वांना पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचं आवाहन केल्याने तणावाची परिस्थिती निवळली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!