ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मोठी बातमी..! केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अखेर अटक

रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक झाली आहे. त्यांना रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतले असुन नारायण राणे यांना संगमेश्वर पोलिस ठाण्यात नेवुन ठेवण्यात आली आहे.

स्थानिक पोलीस अधिक्षक नारायण राणेंना अटक करण्यासाठी आले आहेत. मात्र, त्यांच्याकडे अटक वॉरंट नाहीत. तसेच आमच्यावर दबाव आहे, असे पोलिसांनी म्हटले असल्याची माहिती जनआशीर्वाद यात्रेचे प्रमुख प्रमोद जठार यांनी दिली. राणे यांना अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकण्यात आला. पोलीस अधीक्षकच तसं बोलले आहेत. कोणत्याही वॉरंटशिवाय केंद्रीय मंत्र्यांवर अशी कारवाई करायला हे काय जंगलराज आहे का?, असा सवालही जठार यांनी केला. जठार माध्यमांशी बोलल्यानंतर काही वेळातच अटकेची कारवाई करण्यात आली.

नारायण राणेंविरुद्ध नाशिक, पुणे, रायगड अशा विविध ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर नाशिक आणि पुणे पोलिसांनी कोकणात पथकं पाठवली होती. अखेर पोलिसांनी रत्नागिरीतील संगमेश्वर येथून नारायण राणे यांना अटक केली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात नाशिकमध्ये दाखल झालेल्या एफआयआरनुसार, भारतीय दंड संहितेच्या कलम ५००, ५०५(२), १५३(ब)(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड व पुण्यातही अशाप्रकारची कलमे लावण्यात आली आहेत. या कलमांनुसार, कमाल सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. अशा प्रकरणांत आरोपीला फौजदारी दंड संहितेच्या कलम ४१(अ) अन्वये आगाऊ नोटीस दिल्यानंतरच अटकेची कारवाई करता येते. त्यामुळे अटकेची कारवाई झाली तरी ती बेकायदा असेल, असे राणेंच्या वकिलांचे म्हणणे आहे.

नारयण राणे यांच्या अटके नंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसरकार्वर टिका केली आहे.

केंद्रीय मंत्री श्री नारायणराव राणे यांच्यावरील कारवाई ही सूडबुद्धीने केलेली आहे.

पोलिस यंत्रणेचा दुरूपयोग करीत होत असलेल्या या दडपशाहीचा मी तीव्र निषेध करतो.

शर्जिल उस्मानी मोकाट आणि
नारायण राणे यांना अटक!

हे आहे नवे हिंदूत्त्व आणि
असा आहे नवा महाराष्ट्र !!!

अस ट्विट विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!