बॉम्बस्फोटाच्या घटनेमुळे अफगाणिस्तान हादरलं, काबुल विमानतळावरील बॉम्ब हल्ल्यात “इतक्या” जणांचा मृत्यू
काबूल : तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर आज झालेल्या दोन मोठया बाॅम्ब स्फोटांमुळें संपूर्ण अफगाणिस्तान हादरून गेला आहे.
अफगाणिस्ताचा राजधानी काबूल शहरातील हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गेटवर दोन भीषण स्फोट झाले. या स्फोटामध्ये आत्तापर्यंत शंभराहून अधिक जण बळी पडले आहेत. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. अशी माहिती समोर आली आहे.मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या संदर्भात “द बाईट” या वृत्त संस्थेने बातमी प्रसिद्ध केले आहे.
स्फोटानंतर विमानतळ आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिक भयभीत झाले असून परिसरात खळबळ उडाली आहे.
https://twitter.com/_TheBite/status/1430914841175158785?s=19