ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कुरनूरच्या सेवानिवृत्त शिक्षकाची निवृत्तीनंतरही विद्यार्थ्यांबरोबर बांधिलकी, गरीब विद्यार्थ्यांना दिली ५० हजार रुपयाची शिष्यवृत्ती !

अक्कलकोट , दि.८ :  दातृत्व हे अंगात असावे लागते, ते उसने आणून कधीही चालत नाही आपल्याच शाळेतील विद्यार्थ्यांना सेवानिवृत्त झाल्यानंतर गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत व्हावी म्हणून परशुराम बेडगे यांनी खारीचा वाटा म्हणून ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली आहे. त्याचे वितरण कुरनूरचे सरपंच व्यंकट मोरे, पंचायत समितीचे माजी विरोधी पक्ष नेते बाळासाहेब मोरे,  ह.भ. प आबा महाराज कुरनूरकर, तंटामुक्त अध्यक्ष केशव मोरे, उपाध्यक्ष आप्पासाहेब जाधव,  ज्ञानेश्वर बनसोडे,  श्याम सुरवसे, सुरेश माने यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

हनुमंत मोरे, गोदावरी जाधव, सुजाता बंडगर, समर्थ चव्हाण, स्मिता कुंभार, प्रज्वल शितोळे, श्रीमंत मोरे, आकाश जाधव ,संकेत बेडगे इस्माईल पठाण ,अतुल गवळी या विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक मदत देण्यात आली.या कार्यक्रमात माजी उपसभापती स्वामीराव पाटील, ह.भ.प माणिक जगताप ,स्वामीराव सुरवसे, मुख्याध्यापक महादेव माने, प्रभाकर निंबाळकर, उडगी प्रशालेचे तेली, शहाजी प्रशालचे साळुंके, किसन कांबळे यांचा विशेष सत्कार बेडगे यांच्यावतीने करण्यात आला.

यावेळी बोलताना सरपंच व्यंकट मोरे यांनी परशुराम बेडगे यांनी घेतलेल्या निर्णयाचे कौतुक करून हा उपक्रम आणखी व्यापक स्वरूपात आणण्याच्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे गावातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत होईल, असे सांगितले.  तर बाळासाहेब मोरे यांनी समाजात अशा प्रकारचे दानशूर व्यक्ती आहेत म्हणून ग्रामीण भागातील हुशार गरीब विद्यार्थी पुढे जात आहेत त्यांचा उपक्रम निश्चित कौतुकास्पद आहे,असे सांगितले.

यावेळी विद्यार्थ्यांची मनोगते झाली.सत्काराला उत्तर देताना परशुराम बेडगे यांनी सेवेत असताना सहकार्य केलेल्या सर्व मान्यवरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यापुढेही लोकसेवेचे हे कार्य असेच चालू ठेवणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर जगताप यांनी केले तर आभार विश्वजित बिराजदार यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!