ध्यास विश्वसार्ह बातमीचा

समाजात जडणघडणीत शिक्षकांची भुमिका महत्वाची : महेश इंगळे, शरणमठ ट्रस्ट व सरपंच विलासआप्पा प्रतिष्ठानकडून गुरूजनांचा गौरव

अक्कलकोट, दि.८ : देशाची भावी पिढी घडविण्यात शिक्षकांची भूमिका महत्वाची असून विद्यार्थ्यां बरोबरच समाजात जडणघडणीत शिक्षकांची योगदान मोलाचे आहे, असे मत वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी केले. बोरगावच्या सरपंच विलासआप्पा प्रतिष्ठान आणि शरणमठ संचलित सी.आर.एस. अ‍ॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुरूजनांच्या गौरव सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्यास शरणमठाचे परम पुज्य चिक्करेवणसिध्द स्वामीजीं यांचे दिव्य सानिध्य लाभले होते.

यावेळी व्यासपिठावर शिवसेनेचे संजय देशमुख, राष्ट्रवादीचे दिलीप सिध्दे, मनोज निकम, प्रवीण देशमख,प्रशांत भगरे, शरणमठ ट्रस्टचे अध्यक्ष माणिक निलगार, वारकरी संप्रदायचे रमेश केत, संदिप सुरवसे, मुख्याध्याक अरूण पाटील, महादेव लिबिंतोटे, प्रा. शरणप्पा अचलेर, अरूण लोणारी, मारूती बावडे, आदी उपस्थित होते.

प्रारंभी प्रतिष्ठानचे संस्थापक प्रा. प्रकाश सुरवसे यांनी प्रास्तविकातून कार्यक्रमाचा हेतून स्पष्ट केला. सी.आर.एस. अ‍ॅकॅडमीचे काशिनाथ भतगुणगी यांनी अ‍ॅकॅडमी आणि प्रतिष्ठानच्या भविष्यकालीन कार्याचा वेध घेतले.  यावेळी पुढे बोलताना महेश इंगळे म्हणाले की, बोरगावचे सरपंच विलासआप्पा सुरवसे यांच्या ग्रामीण विकासाच्या कार्याबरोरच प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत असलेल्या सामाजिक कार्य कौतुकास्पद असून त्याला शरणमठाचा आशिर्वाद लाभल्याने येणार्‍या काळात हे प्रतिष्ठान उत्तम कामगिरी करेल. दिलीप सिध्दे म्हणाले की, पिडी घडविण्याची जबाबदारी पार पाडत शिक्षक वर्ग कोरोना काळात योध्दाच्या भूमिकेत वावरला आहे. त्यांच्या कार्याला वंदन करूया. संजय देशमुख म्हणाले की, शिवसेनेचे अक्कलकोटमधील संस्थापक वि.कृ. आण्णा सुरवसे यांच्यामुळे मी राजकारणात यांच्यामुळे आणि शिवसेनेत रमलो. आज तालुका प्रमुख म्हणून काम करत आहोत. वि.कृ. आण्णा यांचे स्मरण होते. त्यांच्या परिवाराच्या या संस्थेकडून पुरस्कार वितरण करताना मनस्वी आनंद होतो.

यावेळी डॉ. शिला स्वामी, शंकर व्हनमाने, धानय्या कौठगी आदी सत्कार मुर्तींनी मनोगत व्यक्त करून शरणमठ व आप्पा प्रतिष्ठानचे आभार मानले. या कार्यक्रमास प्रा. श्रीमंत बुक्कानुरे, भागेश कल्याणी, गुरूशांत स्वामी, गोविंद शिंदे, महेश मोरे,  महादेव बगले, राजू हुक्कीरे, स्वामीनाथ स्वामी, राजू हत्तरके,  लुकेश कडू,  वैभव हुसाळे, बसवराज स्वामी आदी उपस्थित होते.

सुत्रसंचालन मुस्ताक शेख यांनी केले तर संदिप सुरवसे यांनी आभार मानले.

….यांचा झाला गौरव
प्रा. निलकंठ धनशेट्टी, डॉ. राजशेखर हिरेमठ, विश्वनाथ हत्तरके,  शंकर व्हनमाने, डॉ. शिला स्वामी,  प्रा. शिवाजी धडके, फरिद जमादार, विना सुतार, श्रीदेवी पाटील, नितीन मिस्कन, विठ्ठल कुंभार, अनिता बावडे, संगाप्पा होळीकट्टी, दत्ता कटारे, प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी, अतियाबेगम काझी, धानय्या कौठगी यांचा शाल, श्रीफळ, फेटा सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!