BREAKING..! महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणी मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता, अंजली दमानिया करणार हायकोर्टात चॅलेंज
मुंबई : महाराष्ट्र सदनाच्या कथित बांधकाम घोटाळा प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनीही हा अर्ज दाखल केला होता. आपल्यावर करण्यात आलले आरोप हे निराधार आहेत. त्यामुळे न्यायालयाने आपल्याला दोषमुक्त करावे असे भुजबळ यांनी म्हटले होते. भुजबळ यांच्या बरोबर देविशा इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे इतर दोन संचालक राजेश धारप आणि सत्यन केसरकर यांचीही निर्दोष मुक्तता झाली आहे.
भुजबळ बंधूंवर मुंबई सत्र न्यायालयाने गृहनिर्माण प्रकल्पांच्या कामामध्ये फसवणूक झाल्याचा ठपका या दोघांवर ठेवण्यात आला होता. दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम दरम्यान पैशांची अफरातफर केल्याच्या आरोपांवरून भुजबळ यांचे या प्रकरणात नाव आले होते.
या प्रकऱणी भुजबळ यांना कारावासही भोगावा लागला होता. त्यानंतर भुजबळ यांची जामिनावर सुटका झाली होती. आता मुंबई न्यायालयाने आज त्यांना या महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी क्लीन चीट दिली आहे.
दरम्यान, या प्रकरणी समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया मुंबई सत्र न्यायालयाच्या विरोधात हायकोर्टात धाव घेणार आहेत. “छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांची सत्र न्यायालयाकडून महाराष्ट्र सदन केसमधून निर्दोष मुक्तता झाली. या निर्णयाविरोधात मी हाय कोर्टात चॅलेंज करणार आहे” असे ट्विट अंजली दमानिया यांनी केली आहे.
छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांना Session's court कडून महाराष्ट्र सदन केस मधून डिस्चार्ज मिळाला आहे. ह्या डिस्चार्ज ला मी हाय कोर्टात चॅलेंज करणार आहे
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) September 9, 2021