गुरुशांत माशाळ
दुधनी, दि.१० : आत्तापर्यंत दुधनी शहराच्या विकासासाठी जे जे करता आले ते करण्याचा प्रयत्न म्हेत्रे परिवाराने केला आहे. यापुढेही विकास कामे चालूच राहतील, असे प्रतिपादन माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले. दुधनी नगरपरिषदेच्यावतीने गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर माजी आमदार म्हेत्रे यांच्या हस्ते दुधनी नगर परिषद वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत १ कोटी ४८ लाख ६५ हजार रुपयांचा विविध विकास कामांचा आज श्री गणेशा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना म्हेत्रे म्हणाले कि, स्व.सातलिंगप्पा म्हेत्रे यांनी देखील दुधनी शहराच्या विकासासाठी अतोनात प्रयत्न केले आहेत त्यानंतर देखील मी आणि शंकर म्हेत्रे तसेच म्हेत्रे परिवार दुधनी शहराच्या विकासात कधीही कमी पडणार नाही. जनतेने आमची साथ कधीच सोडली नाही. त्यामुळे आम्ही विकासाचा ध्यास सोडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे हे होते. नगरसेवक गुरुशांतप्पा परमशेट्टी, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे, दुधनी शहर काँग्रेसचे अध्यक्ष गुरुशांत ढंगे, रामचंद्रप्पा बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सय्यदबाहोद्दीन दर्गा पाठीमागील हावशेट्टी प्लॉट पर्यंत रस्त्याचे खडिकरण, मानकर समाज मंदिर येथे तारेचे कुंपण व स्वच्छता गृह बांधणे, भाजीपाला मार्केट जवळील सर्वधर्मीय स्मशान भूमीत आंतर्गत सुशोभीकरण या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी आडत व भुसार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष परमशेट्टी, उपाध्यक्ष राजशेखर दोषी, नगरसेवक डॉ. उदयकुमार म्हेत्रे, नगरसेवक गुरुशांतप्पा परमशेट्टी, माजी नगरसेवक सिद्धाराम येगदी, लक्ष्मीपुत्र हबशी, गुलाबसाब खैराट, चांदसाब हिप्परगी, शंकर भांजी, शिवशरणप्पा हबशी, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सातलींगप्पा परमशेट्टी, सिद्धरामेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत येगदी, चंद्रकांत म्हेत्रे, बसवराज हौदे, रामचंद्र गद्दी, राजकुमार लकाबशेट्टी, गुरुशांत हबशी, महांतेश पाटील, संतोष जोगदे, विश्वनाथ म्हेत्रे, शंकर धल्लू, चंद्रकांत धल्लू, शिवकुमार ठक्का, सुरेश तोळणूर, गुरुशांत हिरेमठ, राजू हरशिंग चव्हाण, शंकर चव्हाण, लोकेश राठोड, गोपीचंद राठोड, यांच्यासह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.