दुधनीच्या विकासासाठी जे जे करता आले ते केले : म्हेत्रे, नगरपरिषदेच्या विविध विकास कामांचे उद्घाटन

गुरुशांत माशाळ दुधनी, दि.१० : आत्तापर्यंत दुधनी शहराच्या विकासासाठी जे जे करता आले ते करण्याचा प्रयत्न म्हेत्रे परिवाराने केला आहे. यापुढेही विकास कामे चालूच राहतील, असे प्रतिपादन माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले. दुधनी नगरपरिषदेच्यावतीने गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर माजी आमदार म्हेत्रे यांच्या हस्ते दुधनी नगर परिषद वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत १ कोटी ४८ लाख ६५ हजार … Read more

शाईफेक करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा,  अक्कलकोट काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

अक्कलकोट, दि.२९  :  सोलापूरात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अन्य काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या सोलापूर जिल्हा परिषदसमोरील काँग्रेस भवनासमोरील पोष्टरवर शाईफेक केल्याप्रकरणी अक्कलकोट शहर व तालुका काँग्रेसतर्फे जाहीर निषेध करण्यात आला. यात दगडफेक व शाईफेक केलेल्या अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. शनिवारी, काही अज्ञात समाजकंटकांनी हे कृत्य केले … Read more

ओबीसींच्या न्यायासाठी संघटित होण्याची गरज : म्हेत्रे

अक्कलकोट, दि.२३ : ओबीसी समाजाला न्याय मिळण्यासाठी त्यातील प्रत्येक घटकाने संघटित होण्याची गरज आहे. या विचारानेच आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला अक्कलकोट तालुक्यातील समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले. अक्कलकोट येथील काँग्रेस कार्यालयात सोमवारी ओबीसी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत भाजपच्या केंद्रीय धोरणावर … Read more