ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जॉईन फॉर पीसचे यंदाचे जे.पी. शांतता पुरस्कार जाहीर; रविंद्र मोकाशी, आनंद चंदनशिवे, अमजदअली काझी आणि इक्बाल शेख पुरस्काराचे मानकरी

 

सोलापूर : जॉईन फॉर पीसचे जे.पी. शांतता पुरस्कारासाठी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या चार समाजसेवकांची निवड करण्यात आली आहे. रविंद्र मोकाशी, आनंद चंदनशिवे, अमजदअली काझी आणि इक्बाल शेख यंदाच्या जे.पी. पुरस्काराचे मानकरी असून, जागतिक शांतता दिनी, मंगळवारी, २१ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती जॉईन फॉर पिस मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. जैनोद्दीन मुल्ला आणि सचिव प्रा. जैनोद्दीन पटेल यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये दिली.

जॉईन फॉर पीस मल्टीपर्पज सोसायटी, सोलापूर, ही संस्था समाजातील दुर्बल घटकांच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासासाठी काम करीत आहे. त्याचबरोबर समाजातील विषमता नष्ट करून शांतता व सामाजिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

जॉईन फॉर पीस संस्था, समाजात सामाजिक सलोखा निर्माण होऊन शांतता व बंधूभाव निर्माण होण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे, याचाच एक भाग म्हणून २१ सप्टेंबर जागतिक शांतता दिनाचे औचित्य साधून समता, बंधूता या तत्वांना प्रमाणित मानून स्थानिक पातळीवर सामाज ऐक्य, शांतता व राष्ट्रीय एकत्मता जोपासण्याचे काम करणाऱ्या व्यक्तींना मागील तीन वर्षापासून “JP शांतता पुरस्कार” ने सन्मानीत करण्यात येत आहे.

या वर्षीच्या पुरस्काराचे मानकरी म्हणून रविंद्र मोकाशी (सामाजिक कार्यकर्ते), आनंद चंदनशिवे (नगरसेवक-सो.म.पा.), अमजदअली काझी (काझी व सामाजिक कार्यकर्ते) आणि इक्बाल शेख (ज्येष्ठ पत्रकार) यांची निवड झालेली आहे. निवड झालेल्या मान्यवरांचा यथोचित गौरव करण्यात येणार असून सन्मानपत्र, गौरवचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

या कार्यक्रमास शहारातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. सोशल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आय. जे.तांबोळी यांच्या हस्ते जागतिक शांतता दिनी, मंगळवार, दिनांक २१ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ०५ वा. सोशल कॉलेज, नवीन बिल्डींगच्या हॉलमध्ये निवडक निमंत्रितांच्या उपस्थितीत व कोरोना नियमांचे पालन करून कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती पुरस्कार निवड समितीने दिली आहे.

या पुरस्काराची निवड झालेल्या मान्यवरांवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!