---Advertisement---

आ.विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते पावन गणपतीची पूजा, नरेंद्र मोदी यांच्याकडून सर्वांनी साधेपणा घ्यावा

Follow Us:
---Advertisement---

 

सोलापूर – प्रभाग ९ कर्णिक नगर येथील पावन गणपती येथे देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी पूर्व मंडल सोलापूर शहराच्यावतीने माजी पालकमंत्री आ.विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते पावन गणपतीची पूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. नरेंद्र मोदी हे देशभरातील एक मोठे नेते आहेत परंतु असे असताना देखील ते एक दम साधेपणाने राहतात याकाळामध्ये जर आपल्याला नरेंद्र मोदी यांच्या कडून काय शिकायचे असेल तर तो म्हणजे साधेपणा ते अत्यंत साधे पणाने राहतात व तळागाळा पर्यंत पोहचून नागरिकांच्या समस्या सोडवतात आजच्या काळात पुढाऱ्यांनी नरेंद्र मोदींकडून साधे पणा घेत सर्व सामान्यांपर्यंत पोहचून नागरिकांच्या समस्या सोडवणे गरजेचे आहे असे मत कर्णिक नगरचे चेअरमन अशोक काजळे यांनी व्यक्त केले. यावेळी त्यापरिसरतील नागरिकांनी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले व कोव्हिडं काळात काम करणाऱ्या संघटनांचा व सामाजिक कार्यकर्त्यांचा देखील सत्कार करण्यात आला.

यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख, सभागृहनेते शिवानंद पाटील, परिवहन सभापती जय साळुंखे, पूर्व मंडल कोषाअध्यक्ष किरण भंडारे, भारतीय जनता पार्टी पूर्व मंडल अध्यक्ष सुनील गौडगाव, सरचिटणीस बिज्जू प्रधाने, संघटन सरचिटणीस रुदरेश बोरामनी, नगरसेविका रामेशवरी बिरू, कर्णिक नगरचे चेअरमन अशोक काजळे, शहर उपाध्यक्ष विजयाताई वड्डेपल्ली, तरुण भारतचे संपादक पिसे, रामचंद्र जन्नू, भीमाशंकर जावळे, श्रीशैल शेल्ली, श्रीकांत बिराजदार, गवते, गिरीश बतूल, अप्पाराव खट्टे गुरुजी, सुभाष थांबड, नागेश बिराजदार, अमोल शेल्ली, संतोष पुडुर, सुरेश चीकळी, प्रकाश भंडारे, गुरू अक्कलकोटे आदीजण उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!