---Advertisement---

त्रिपुरारी पौर्णिमा व गुरुनानक जयंतीनिमित्त वटवृक्ष मंदिरात परगावच्या पालखी सोहळ्यांचे आगमन

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, प्रतिनिधी – त्रिपुरारी पौर्णिमा व गुरुनानक जयंतीनिमित्त श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. भाविकांना सुलभतेने दर्शन घेता यावे, यासाठी मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या दिवशी मंदिरात स्वामी भक्तांच्या वतीने नियमित होणारे अभिषेक बंद राहणार आहेत. अभिषेकाची पावती घेतल्यास अंगारा व प्रसाद देण्यात येणार आहे.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पुणे, मुंबई, दौंड, मालेगाव, मसले चौधरी, बार्शी, धाराशिव, सोलापूर, कर्जत, भोर, खर्डी-पंढरपूर आदी ठिकाणांहून दिंडी व पालखी सोहळ्यांसह पायी येणाऱ्या स्वामी भक्तांचे मंदिरात आगमन होणार आहे. या भाविकांसाठी श्री वटवृक्ष देवस्थानच्या वतीने मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील भक्त निवास भोजन कक्षात दुपारी १२ ते ४ या वेळेत भोजन महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.

भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात राहणार असून, पालखी व दिंडीसोबत येणाऱ्या भक्तांना टप्प्याटप्प्याने दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे. तसेच पुरुष व महिला भाविकांसाठी स्वतंत्र दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भक्तांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिंडी व पालखी सोहळ्यांसह येणाऱ्या तसेच अन्य स्वामी भक्तांनी श्रींच्या दर्शनाचा, सेवाभावी उपक्रमांचा आणि भोजन महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री वटवृक्ष देवस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने मंदिर समितीचे चेअरमन तथा विद्यमान नगरसेवक महेश मालक इंगळे यांनी केले आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!